शिक्षकांच्या शाळांतील उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 07:19 PM2020-06-16T19:19:11+5:302020-06-16T19:19:33+5:30
शिक्षण संस्थांकडून रेड झोनमधील शिक्षकांना शाळेत बोलावण्याच्या तक्रारींवरून कार्यवाही
मुंबई : शाळा अद्याप सुरु नाहीत मात्र ग्रीन झोनमधील शिक्षकांनी ऑनलाईन लर्निंग आणि शाळा सुरु करण्याच्या पूर्वतयारीसाठी शाळांमध्ये यायचे की नाही ? उपस्थिती किती असायला हवी ? या सोबत मुंबई पुण्यासारख्या रेड झोनमधील शिक्षकांनी काय करायचे याबद्दल अद्यापही शिक्षक व शैक्षणिक संस्थांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी लवकरच शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमधील शिक्षकांनी शाळेत केव्हा उपस्थित रहावे ? त्यासाठी शिक्षण संस्थांसाठी काय मार्गदर्शक सूचना असतील यासाठीचे निर्देश या मार्गदर्शक सूचनांमध्ये असणार आहेत.
दरम्यान शाळा सुरु करण्यासाठीच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना या मोघम असल्याचा दावा शिक्षक संघटना करत आहेत. शिक्षकांनी आपण शिकवीत असलेल्या लागावी उपस्थित रहायचे किंवा शाळांमध्ये उपस्थिती दर्शवायची म्हणजे शिक्षकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासारखे असल्याचे शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी म्हटले आहे. तर शिक्षण विभागाने आपली जबाबदारी अन्य विभागावर टाकून स्वतः यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही ठोस उपाययोजना नसताना जुलैमध्ये शाळा सुरु करण्याचा अट्टाहास शिक्षण विभाग का करत आहे असा प्रश्न त्यांनी केला आहे. सोबतच लोकल, मेट्रो सह अन्य वाहतुकीची कोणतीही सुविधा नसल्याने शिक्षकमुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक तसेच ठाणे, पालघर व रायगड शिक्षणाधिकारी क्षेत्रांतर्गत शाळांना सूचना नसल्याने अनेक ठिकाणी शाळांमध्ये शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना -शिक्षकेतर जीवावर उदार होऊन स्वतः खर्च करून शाळेत जात असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर अनेक संस्था नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने रेड झोन असतानाही इतर कामांसाठी शिक्षकांना शाळांमध्ये बोलावून घेत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. त्यामुळे रेड झोन किंवा कंटेनमेंट झोनमधील शाळांच्या शिक्षकांच्या उपस्थितीबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याच्या प्रत्येक भागातील परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासन यंत्रणेने घ्यायचा असल्याने ही जबाबदारी स्थनिक प्रशासनावर सोपविली असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.