एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 04:16 AM2020-05-15T04:16:41+5:302020-05-15T04:17:07+5:30

एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने  वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री,  परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला गेला होता.

issue of The salaries of ST employees | एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटणार

Next

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे मासिक वेतन कर्मचाºयांना देण्यासंबंधात एसटी महामंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
एप्रिल महिन्याचे मासिक वेतन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस यांच्यावतीने  वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री,  परिवहन मंत्री, परिवहन राज्यमंत्री यांना पत्रव्यवहार केला गेला होता.
एसटी कर्मचाºयांना वेतन देण्याबाबत राज्य शासनाकडे विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीचा शिल्लक निधी मिळण्याबाबत महामंडळाकडून  प्रस्ताव पाठवला गेला होता. तो निधी लवकरात लवकर मिळविण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू होते. 
संघटनेच्या नेतृत्वाकडून वेतन देण्याबाबत सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. या सर्व प्रयत्नांमुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

एसटी कर्मचारी वेतनाचा तिढा एका महिन्यापुरता सुटला; लॉकडाउनमुळे लालपरी पूर्णत: बंद  
उत्पन्न थांबल्याने १ लाख ७ हजार कर्मचाºयांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्य सरकारने सवलतीची प्रतिपूर्ती असलेल्या ५४७ लाखांच्या रकमेपैकी २५० कोटी एसटीला देऊ केल्याने एका महिन्यापुरता वेतनाचा तिढा सुटला आहे. ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी केली होती. लॉकडाउन काळात अत्यंत बिकट परिस्थितीत एसटीला सवलतीच्या थकबाकीची रक्कम देऊन कर्मचाºयांच्या वेतनाचा  तिढा सोडविल्याबद्दल राज्य सरकारचे आभार व्यक्त करत आहोत.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस 

मान्यताप्राप्त संघटनेच्यावतीने एसटी कामगारांचे वेतन होण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार एसटी महामंडळाला वेतन अदा करण्यासाठी सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी २५० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच एप्रिल महिन्याचे देय मासिक वेतन कर्मचाºयांना देण्यात येणार आहे. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्ट्रेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना    

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार एसटी कर्मचाºयांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात अदा करण्यासाठी राज्य सरकारने विविध प्रवास सवलत मूल्यांच्या प्रतिपूर्तीपोटी द्यावयाच्या रकमेसह एप्रिल या महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी ३०० कोटी रुपये एसटी महामंडळास द्यावेत. जेणेकरून एसटी कर्मचाºयांचे वेतन अदा होईल, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीतून २५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाºयांच्या वेतनाचा प्रश्न सुटला असून १ लाख ५ हजार कर्मचाºयांना वेतन मिळणार आहे. 
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी
वर्कर्स काँग्र्रेस (इंटक)  

Web Title: issue of The salaries of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.