एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:14+5:302021-09-03T04:06:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे ...

The issue of salaries of ST employees was resolved | एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर आवश्यक बाबींसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिले. त्यानुसार, तत्काळ निधी वितरित केल्याने एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे.

या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात एसटी महामंडळासाठी १४५० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ८३८ कोटी रुपयांचा निधी एसटीला यापूर्वीच देण्यात आला आहे. उर्वरित ६१२ कोटींपैकी ५०० कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यातून महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होतो आहे. त्यामुळे महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काही उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: The issue of salaries of ST employees was resolved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.