नवी मुंबई : सिडकोनिर्मित्त धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाने अडीच एफएसआय देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र आचारसंहितेमुळे रखडलेली अडीच एफएसआयची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करून सदरचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून दिला आहे. तो शासनाने मंजूर केला आहे. याविषयीची संचिका ६ सप्टेंबर रोजी प्रसिध्द् झाली आहे. मात्र अधिसूचना प्रसिध्द करण्याची कायदेशीर कार्यवाही शिल्लक आहे. त्यामुळे सदरची अधिसूचना तातडीने प्रसिध्द करावी, अशी मागणी नाईक यांनी निवेदनात केली आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली बांधकामांना सरंक्षण देऊन ती नियमित करावीत तसेच ऐरोली, वाशी आणि खारघर टोलनाक्यावर नवी मुंबईच्या वाहनांना टोल माफी आदि मागण्या नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. (प्रतिनिधी)
अडीच एफएसआयची अधिसूचना जारी करा
By admin | Published: November 03, 2014 12:51 AM