मुंबई : केवळ मुस्लीम असल्याने एमबीएची पदवी घेतलेल्या झीशान खानला नोकरी नाकारल्याने त्याने याविरोधात आवाज उठविला. सोशल मीडियावर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताच जगभरातून त्याला पाठिंबा मिळाला आहे. झीशानच्या या भूमिकेमुळे तो रातोरात स्टार झाला आहे.कुर्ला येथील फादर पीटर परेरा रोड येथे राहणाऱ्या झीशानने पनवेल येथील डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीतून एमबीएची पदवी घेतली. नोकरीच्या शोधात असताना वांद्रे येथील हरिकृष्णा एक्सपोर्ट या डायमंड कंपनीकडे नोकरीसाठी त्याने बायोडेटा पाठवला होता. त्यावर कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्ही केवळ बिगर मुस्लिमांनाच नोकरी देतो, असे उत्तर दिले. संबंधित कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. एचआर विभागातील ज्या महिलेने मेल पाठवला त्या महिलेसह काही कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. झीशानला आलेला मेल, तसेच कंपनीने टिष्ट्वटरवर केलेला खुलासा आदी तपशील गोळा करण्यात आला आहे. याप्रकराणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती बीकेसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंडलिक निगाडे यांनी दिली. कंपनीने फोडले ‘टिके’वर खापर मुस्लीम असल्याने नोकरी नाकारलेल्या हरिकृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या डायमंड कंपनीने मात्र आपली चूक मान्य करण्यापेक्षा आपल्या खुलाशामध्ये सर्व खापर ईमेल करणाऱ्या दीपिका टिके या महिलेवर फोडले आहेत. ती गेल्या चार वर्षांपासून या कंपनीत काम करीत आहे. घटनेनंतर लिंक इनवरील तिचे प्रोफाइल पेज गायब करण्यात आले आहे. मग ती नवखी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘तो’ सोशल मीडियावरही झाला स्टार
By admin | Published: May 23, 2015 1:30 AM