मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे. मोदी-शहांना पुन्हा लक्ष करत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत. मोदी B.A. पास की नापास विचारलं म्हणून RTI कायदाच बदलला. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ, त्यांचा पगार सरकारने ठरवायचा, असा कायदा पारित करून घेतला. माहिती आयुक्तांची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली. मोदींचं नक्की शिक्षण काय आहे ह्याची माहिती माहिती अधिकाराखाली मागवली गेल्यापासून हा कायदाच बदलला आहे. तेव्हापासून ह्या कायद्यावर अंकुश आणायचा निर्णय घेतला गेला, अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली आहे.पुढे ते म्हणाले, निवडणुकीत हार जीत होत असते, पण कोणी फसवत असेल तर कसं चालेल, सगळे फिक्स असेल तर एवढी मेहनत करायची कशाला. दहशतवाद कायदा; सध्याचा कायदा जो पारित करून घेतला आहे, त्यानुसार एका व्यक्तीला दहशतवादी ठरवायचा अधिकार सरकारला म्हणजेच अमित शाह ह्यांना मिळाला. त्यामुळे कोणी एखादं आंदोलन केलं, तर त्याला दहशतवादी ठरवून त्याला अटक करायचे अधिकार ह्या कायद्याने आले. हे सगळं बहुमताच्या जोरावर केलं आहे.
मोदी B.A. पास की नापास विचारलं म्हणून RTI कायदाच बदलला- राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 12:50 PM