Join us

अखेर जुन्या मुंबईचे ‘ते’ वैभवस्थळ झाले सुरक्षित, परळच्या मैलाच्या दगडाचे होणार जतन!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 1:07 PM

ब्रिटिशांनी पावणे दोनशे वर्षापूर्वी मुंबईत मैलाचे दगड लावले आहेत.

मुंबई : ब्रिटिशांनी पावणे दोनशे वर्षापूर्वी मुंबईत मैलाचे दगड लावले आहेत. त्या दगडांपैकी परळ एस. एस. राव मार्ग फुटपाथवरील ५ क्रमांकाच्या दगडाचे दोन तुकडे झाले होते. शिवाय या स्थळाची दुरवस्था झाली होती. याकडे ‘लोकमत’मध्ये मुंबईचे जुने वैभवस्थळ नष्ट या मथळळ्याखाली एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.  

या वृत्ताची  मुंबई पालिकेने तातडीने दखल घेतली आणि पालिकेच्या पुरातन वास्तूजतन कक्षाकडून परळ येथील मैलाच्या दगडाचे जतन करण्यात आले. पालिकेने तुटलेले दोन्ही दगड एकत्र जोडून पूर्वीप्रमाणे दगड उभा केला आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा एकदा जुन्या मुंबईचे परळ येथील वैभवस्थळ पाहता येणार आहे. 

हा दगड जुन्या मुंबईचे वैभव दाखविणारा असल्याने त्याचे जतन आणि संरक्षण करणे गरजेचे आहे. पालिकेला अतिक्रमण हटवताना एस. एस. राव मार्ग फुटपाथवर जमिनीत साडेचार फूट उंचीचा हा मैलाचा दगड सापडला होता. हा दगड बेसॉल्ट खडक असून तो पाच क्रमांकाचा दगड आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या दगडाचे दोन तुकडे झाले होते. त्यातील एक तुकडा बुधवारी येथून नाहीसा झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. 

टॅग्स :मुंबई