Join us

Video : जनतेमुळेच कोरोना होतो का?, शिवसेनेच्या आमदारपुत्राचा मंदिरात अभिषेक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 4:55 PM

Video : भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, सरकारला लक्ष्य केले.   

ठळक मुद्देशिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का, यांनी कुठले पुण्य केलंय?, असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. 

मुंबई - राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपतर्फे राज्यभरात जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात आणि पंढरपुरातदेखील पाहायला मिळाले. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती परिसरात एकत्र येत शंखनाद आंदोलन केले. तर, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही घुसकण्याचा प्रयत्न भाजपा कार्यकर्त्यांकडून झाला. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनाआमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा मंदिरातील व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावरुन, सरकारला लक्ष्य केले.

पुण्यात आंदोलनकर्त्यांनी देशासाठी, धर्मासाठी.. भाजप.. भाजप, बोल बजरंगबली की जय, मंदिरांना बंदी, मदिरा विक्रीला संधी अजब हे सरकार, उघड दार उद्धवा, उघड दार उद्धवा, गणपती बाप्पा मोरया... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुद्धी द्या! यासारख्या घोषणा देत भाजपने आंदोलन केले. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, दुसरीकडे आमदार नितेश राणेंनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला. जनतेसाठी मंदिरं बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का, यांनी कुठले पुण्य केलंय?, असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. 

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर चंद्रकांत पाटील, महापौर, मुळीक यांनी गणपतीची आरती केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. आता या बहिऱ्या सरकारला ऐकू येईल ही अपेक्षा आहे. मंदिर उघडी करा, नियम ठरवा, निवडक संख्येत लोकांना मंदिराच्या आत सोडावे. नियमांचं पालन भाविकांनी केलं पाहिजे. अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असेही पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :शिवसेनाआमदारनीतेश राणे कोरोना वायरस बातम्या