प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:24 AM2022-01-15T07:24:08+5:302022-01-15T07:29:09+5:30

कोविड काळातील कार्याचे घरच्यांनी नव्हे पण न्यूयॉर्कमधून कौतुक झाले. कोणी कौतुक करावे म्हणून काम करीत नाही.

It doesn't make sense to ask questions; CM Uddhav Thackeray's scathing criticism on the opposition | प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

Next

मुंबई : कोविड काळातील कार्याचे घरच्यांनी नव्हे पण न्यूयॉर्कमधून कौतुक झाले. कोणी कौतुक करावे म्हणून काम करीत नाही. पण जरा कुठे खुट्ट झाले की विरोधक पालिकेच्या डोक्यावर खापर फोडण्यास तयार असतात. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध होणार आहे. या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कामे न करता बोलणारे देखील अनेक लोक आहेत. तर, काही लोक काम करतात पण बोलतच नाहीत. मग त्याला आपण असे म्हणतो की ‘जंगल मै मोर नाचा किसने देखा’. तर आपण सगळ्यांना दाखवतोय की आम्ही काय करतो आहोत. यामध्ये लपवाछपवीसारखे काहीच नाही. आमचा कारभार  उघडा आहे, जे काय आहे ते तुमच्या सेवेसाठी आम्ही करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महापालिका आणि राज्यातील माझ्या सहकाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यामुळे आज जागतिक स्तरावर कौतुक  होत आहे, अशी कृतज्ञता त्यांनी  व्यक्त केली. 

आता ‘तीळगूळ’ न देताच होईल काम

सर्वसाधारणपणे शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतेही काम तीळगूळ दिल्याशिवाय होत नाही. मात्र इकडे तीळगुळ न देता सुद्धा काम तर होणारच आहे. सरकारी कार्यालयात गोड बोलणे सोडाच, बोलणे देखील खूप अवघड मानले जाते.

लोकाची साधी काम करणे बाजूलाच राहिले, पण साधे उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येते. मत मागताना जे लोक झुकलेले असतात, ते मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात. अशा वेळी हा जो कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत, तो मी म्हणेन की खरच एक क्रांतिकारक कार्यक्रम आहे.

Web Title: It doesn't make sense to ask questions; CM Uddhav Thackeray's scathing criticism on the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.