शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 07:44 AM2023-06-12T07:44:13+5:302023-06-12T07:46:00+5:30

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना काही दिवसापूर्वी ट्विटरवरुन धमकी देण्यात आली होती.

it engineer arrested threatening to kill sharad pawar | शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

googlenewsNext

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले होते. ही धमकी ट्विटरवरुन दिली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना भेटून तक्रार दिली होती, तसेच कारवाईची मागणीही केली होती. या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली असून एका आयटी इंजिनिअरला अटक केली. आरोपीला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

साखळी ओढणाऱ्यांचे प्रमाण ‘मरे’त वाढले, महिन्याभरात ९४१ प्रकरणांची नोंद 

आरोपी आयटी इंजिनिअर आहे, त्याचे नाव सागर बर्वे असं आहे. या आरोपीला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. फेसबुक आणि ट्विटरसह सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमक्या मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. नरेंद्र दाभोलकरांसारखेच पवारांचे होईल असं फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी विवेकवादी नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली होती.
  
फेसबुकच्या धमकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने शुक्रवारी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात वेगळा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, ज्या आयपी अॅड्रेसवरून पोस्ट अपलोड करण्यात आली होती तो बर्वे यांचा असल्याचे गुन्हे शाखेला आढळून आला.

शरद पवार यांना धमकी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी सरकारने गांभीर्याने घेतली असून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले होते. तर उपदेवेंद्र फडणवीस यांनी अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते. पवार हे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते असल्याचे सांगून शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल. गरज पडल्यास पवारांची सुरक्षा वाढवण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

खासदार शरद पवार यांना दिलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. फडणवीस यांनी अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे सांगितले होते. गरज पडल्यास पवारांची सुरक्षा वाढवण्यास पोलीस अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

Read in English

Web Title: it engineer arrested threatening to kill sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.