सरकारला घालवलेलंच बरं, बोला, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 08:22 AM2018-12-24T08:22:52+5:302018-12-24T08:23:28+5:30

आम्ही आज पंढरपूरला निघालो आहोत. अयोध्या वारी नंतर ही पंढरपूरची वारी आहे. पत्रकारांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारले

It is good to leave the government, say, uddhav thakery says in samana | सरकारला घालवलेलंच बरं, बोला, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!’

सरकारला घालवलेलंच बरं, बोला, ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल!’

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरीची वारी करणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी अयोध्येनंतर आता पंढरपूरातउद्धव ठाकरेंकडून आरती करण्यात येत आहे. चंद्रभागेल नमन करुन विठु-माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या सामनाच्या संपादकीय मध्ये पंढरीची वारी नावाने अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्यामध्ये सरकारला जागं करायचं नसून  घालवायचं आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

आम्ही आज पंढरपूरला निघालो आहोत. अयोध्या वारी नंतर ही पंढरपूरची वारी आहे. पत्रकारांनी आम्हाला तेव्हा प्रश्न विचारले, ‘अयोध्येवर ‘स्वारी’ करायला निघाला आहात त्यातून काय साध्य होणार?’ आताही तेच प्रश्न विचारले जात आहेत. ‘पंढरपूरवर स्वारीचे प्रयोजन काय?’ हे सवाल – जवाब निरर्थक आहेत. ही ‘स्वारी’ नसून फक्त वारी आहे. स्वारी जिंकण्यासाठी केली जाते. वारी एका श्रद्धेने, आशीर्वादासाठी होते. अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी चार वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे. सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे युतीबाबतची घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपाकडून शिवसेनेसोबत युती होणारच, असा आत्मविश्वासानं सांगायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेनं युती करणार नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे युतीबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.  

सरकारला जागं करण्यापेक्षा ते घालवलेलचं बर, असे म्हणत एकप्रकारे उद्धव ठाकरेंनी राज्यातील भाजप सरकारसोबत जाणार नसल्याचेच अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. आता जनतेने उसळून उठायला हवं. म्हणूनच पंढरीच्या पावन भूमीवर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ हा लक्ष जनांच्या मुखातून उठणारा गगनभेदी जयघोष ऐकण्यासाठी आकाशामध्ये तेहतीस कोटी देवांच्या विमानांची दाटी होईल व ते आमच्या कार्यास आशीर्वाद देतील, असे सामनाच्या अग्रलेखात ठाकरेंनी म्हटले आहे.  

Web Title: It is good to leave the government, say, uddhav thakery says in samana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.