Join us

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी १० जानेवारी ठरणार 'निर्णायक'; आमदार अपात्रतेच्या निकालाची तारीख ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 2:20 PM

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर सुनावणी सुरू आहे.

Shiv Sena ( Marathi News ) : मुंबई-  गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार अपात्रतेवरुन सुनावणी सुरू आहे. विधीमंडळातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे.  दरम्यान, आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्रा प्रकरणी मुहूर्त ठरला आहे. १० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेनंतर हा निकाल लागेल. विधीमंडळामध्ये निकाल असेल, शाब्दीक त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. निकालातील ठळक मुद्दे यावेळी वाचले जाणार आहेत. 

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी: हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील आमदारांची सुनावणी सरू आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल ३१ डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत दिली होती. ती मुदत पुन्हा वाढवून देण्यात आली. आता हा निकाल काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. आता हा निकाल काय लागणार यावर राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेतील आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी १० जानेवारी रोजी दुपारी ४ नंतर निकाल येणार असल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळात निकालातील शाद्बिक त्रूटी दूर करण्याचे काम सुरू असून निकालातील ठरळ मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत. सविस्तर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे