मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटले आहे. तसेच राज्यपालांच्या या विधानाविरोधात सर्वच स्तरामधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना परक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. कोश्यारींना कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल, कडवे हिंदू असाल, ज्यांच्यामते आम्ही हिंदुत्व सोडलंय. ते हिंदू सुद्धा असतील आणि मराठी सुद्धा असतील त्या सरकारने राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे, असं आक्रमक मत उद्धव ठाकरे यांनी मांडलं आहे.
उद्धव ठाकरे राज्यपालांवर टीकेचा घणाघात करताना म्हणाले की, कोश्यारींना घरी पाठवायचं की तुरुंगात हे ठरवावं लागेल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं नीच काम त्यांनी केलंय. राज्यपाल म्हणून महाराष्ट्राचं मीठ गेली तीन वर्षं खाताय, त्या मिठाशी त्यांनी नमक हरामी केलीय. जे नवहिंदुत्ववादी आहेत. कडवे हिंदू असतील, मोडधारी सत्ताधारी हिंदूंना, ज्यांच्या मते आम्ही हिंदुत्व सोडलंय. राज्यपालांबद्दल सरकारने भूमिका घ्यायला पाहिजे. हे पार्सल राज्यपालपदाचा आदर राखत नसेल. मराठीचा अपमान करत असेल, तर त्यांना घरी पाठवायचं की तुरुंगात याचा निर्णय घ्यावा लागेल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
राज्यपालांनी महाराष्ट्राचा,मराठी माणसाचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची एक संस्कृती, परंपरा आहे. महाराष्ट्रात अनेक गोष्टी त्यात आहेत. त्यांना कोल्हापूरचं वहाण त्यांना दाखवायची गरज आहे. ते महाराष्ट्राचं वैभव आहे. त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात साधी माणसं काय कष्टानं वर येतात हे सांगण्यासाठी मी त्याचा वापर केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. हे अनावधानानं आलेलं विधान नाही. काही ठिकाणी राज्यपाल तत्परतेनं हलताना दिसतात, काही ठिकाणी ते अजगरासारखे सुस्त बसलेले दिसतात , असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.