पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या १०९ कामगारांना सेवेत घेणे अशक्य, अनिल परब यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 05:36 AM2022-04-11T05:36:33+5:302022-04-11T05:36:52+5:30
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत
मुंबई :
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जे कामगार २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होतील त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी ज्या १०९ आंदोलकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेणे शक्य नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
परिवहन मंत्री परब म्हणाले की, राज्यातील सेवा परत सुरू करण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. पाच महिने बंद असलेल्या बसगाड्या पूर्ववत करण्यासाठी बस आगारांनी तपासणी केली आहे. २२ तारखेपर्यंत जर संपकरी कामगार कामावर आले नाहीत तर कंत्राटी खासगीकरण करता येईल का, याचा विचार सुरू आहे. एसटी संचालक मंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होईल.