मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक, अन्यथा होईल कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 04:38 PM2022-10-14T16:38:36+5:302022-10-14T16:42:02+5:30

Traffic Rules In Marathi: मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे.

It is mandatory for all passengers traveling by car in Mumbai to fasten their seat belts, otherwise action will be taken | मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक, अन्यथा होईल कारवाई 

मुंबईत कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक, अन्यथा होईल कारवाई 

Next

मुंबई - मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. मुंबईत कारमधून प्रवास करणऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्ये वाहतूक विभागाकडून मोठा बदल करण्यात आला आहे. आता मुंबईमध्ये कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट वापरणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन करण्यासाठी कारमध्ये आवश्यकते बदल करण्यासाठी १ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मुंबईमध्ये याआधी दुचाकीवरीन प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारासोबत सहप्रवाशांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानंतर आता वाहतूक विभागाने कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीच्या नियमामध्येही मोठा बदल केला आहे. या बदलानुसार आता चार चाकी वाहनातील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे आदेश मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहेत.


दरम्यान, सील बेल्ट बांधणे टाळून या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर १ नोव्हेंबर २०२२ पासीन मोटार वाहन (सुधारित) कायदा २०१९ १९४(ब)(१) अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे. 

Web Title: It is mandatory for all passengers traveling by car in Mumbai to fasten their seat belts, otherwise action will be taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.