महाराष्ट्रात कोविड रोखणे गरजेचे; माजी आरोग्य मंत्र्याची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
By मनोहर कुंभेजकर | Published: December 25, 2022 02:44 PM2022-12-25T14:44:31+5:302022-12-25T14:45:01+5:30
कोविडसाठी असलेली सूत्री पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली.
मुंबई-सध्या जागतिक पातळींवर वाढती ओमायक्रॅान सब व्हेरियन्टचे वाढते अस्तित्व, बॅाम्ब सायक्लोनमुळे पसरलेली तीव्र थंडी , पाऊस वारा बर्फाचे वादळ, नोंदले गेलेले न्यूनतम उणे तापमान यामुळे जगाची चिंता वाढली आहे . ट्रॅव्हल कंपन्यानी बुकिंग कॅन्सल केली आहे.चीन,अमेरिका, कॅनडा ब्राझील,युरोप या देशांतील कोविड वाढीची झळ भारताला पर्यायाने मुंबई महाराष्ट्रला बसणारच हे निर्विवाद सत्य आहे. चीनमध्ये कोविडने उडालेला हाहाकार लक्षात घेता आणि नववर्षाचे सेलिब्रेशन, महाराष्ट्रात पुन्हा परतणारे पर्यटक, थंडीची लाट नागरिकांची मानसिकता, या सर्व गोष्टीवर महाराष्ट्रात कोविड रोखणे गरजेचे असल्याचे असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.
याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी महाराष्ट्रात कोविड रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. झिरो कोवीड पॅालीसी चीनला भोवली का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. चीन मधील रूग्णांची संख्या इतकी का वाढली ? अमेरिका युरोप चीन मधील संसर्गासाठी थंडीची लाट जबाबदार आहे कां? जीनोम सिक्वेसिंग त्वरित होईल का?याचे सुद्धा संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
WHO च्या कोवीड-१९ च्या एक्सपर्ट मारिया केरखोव्ह यांनी असे म्हटले आहे की, ओमायक्रॅानचे ५०० पेक्षा अधिक व्हेरीएंन्ट वातावरणात वावरत आहेत, त्याबरोबर फ्ल्यू, ,रेस्पीरेटरी व्हायरस , वावरत आहे फ्रिजींग कोल्ड मुळे याची संसर्ग क्षमता वाढल्याने एकदा संसर्ग सुरू झाला की एक व्यक्ती ८ ते १० जणाना संसर्गित करू शकते.त्यामुळे ट्रकिंग टेस्टींग, ट्रीटमेंट सोबत प्रतिबंधात्मक लसीकरण ,मास्क बंधनकारक, सोशल डिस्टेंसिंग ,आवश्यक आहे, तसेच जीनोम सिक्वेन्सिंग हे वारंवार विशेषत: परदेशातून येणारे प्रभावीत क्षेत्रातून येणारया प्रवाशातून केवळ २% लोकाची आर. टी पी सी आर करण्यापेक्षा जास्त करणे आवश्यक आहे. तसेच प्रवाशाचे ट्रॅकिंग करावे.
या बरोबरच जी हॉस्पिटल इतर आजारावर दुर्दम्य आजारावर उपचार करतात त्या हॉस्पिस्पीटल जे ८०% बेड्स रिझर्व्ह करू नयेत.याउलट अंधेरी पूर्व मरोळ येथील सेव्हन हिल्स सारखे कोविड हॉस्पिटल बंद करण्याचा पालिका प्रशासनाचा झालेला निर्णय रद्द करून संसर्गजन्य रोगासाठी सदर हॉस्पिटल राखून ठेवावे. तसेच कोविडसाठी असलेली सूत्री पुन्हा एकदा मुंबईसह राज्यातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती डॉ.दीपक सावंत यांनी दिली.