Join us

जनताच तुम्हाला तडीपार करणार; भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 7:37 AM

शेलार यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींचा उल्लेख करत अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महापालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेवर  हल्ला चढवला आहे. शुक्रवारी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या पंचवीस वर्षांत  पेग्वीन सेनेने जो ‘चमकोगिरीचा’ अजेंडा सुरू केला होता, त्यातून महापालिका आता बाहेर पडतेय, असे आशावादी चित्र पाहायला मिळत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला होता. आता मुंबई भाजपच्या ‘एक्स’ अकाउंटवरून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जनता तुम्हाला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे. 

शेलार यांनी अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींचा उल्लेख करत अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना - आयुष्मान भारत आरोग्य योजना व गरीब रुग्ण साहाय्यता निधीमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी महापालिकेमार्फत दर परिपत्रक प्रसारित करण्यात येणार आहे. 

योजनांची जंत्री शेलारांकडून सादर२०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५०० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी ७ स्मशानभूमी पीएनजी गॅसमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि ९  स्मशानभूमीमध्ये लाकडांऐवजी ब्रिकेटचा वापर करता यावा, यासाठी १७१६.८५ कोटींची तरतूद करण्यात आली  आहे. सफाई कामगारांच्या घरांसाठी असलेल्या आश्रय योजनेसाठी गतवर्षी ४००  कोटींची तरतूद होती. यावर्षी त्यामध्ये वाढ करून १०५५ कोटी रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेत गतवर्षी १११.८३ कोटी तरतूद होती ती यावर्षी वाढवून ५०७.९८ कोटी एवढी करण्यात आली आहे, अशा योजनांची जंत्री शेलार यांनी यावेळी सादर केली.

टॅग्स :भाजपाउद्धव ठाकरेशिवसेना