मुंबई- दावोस येथे गुंतवणूकदारांची आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत. राज्यात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली, यावरुन आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.
आज शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा संदर्भात सुनावणी होणार आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चिन्हावरुन वाद सुरू आहे.'शिवसेना कुणाची हा प्रश्नच नाही, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जी शिवसेना आहे तिच खरी शिवसेना आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
'महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार असेलतर त्याच स्वागतच आहे, पण, राज्यातून बाहेर गेलेले उद्योग ही गंभीर बाब आहे. या गुंतवणुकीसाठी काही यांनी काही प्रयत्न केले नाहीत, असंही संजय राऊत म्हणाले.
'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'; एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
भारत जोडो यात्रेत सहभागी होणार
मी जम्मू काश्मीरला जाणार आहे. तिकडे काश्मिरी पंडीतांना भेटणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
'शिवसेना एकच आहे. शिवसेना कुणाची हा प्रश्नच येत नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आहे तिच खरी शिवसेना आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
'नाकासमोरुन पळवून नेलेले उद्योग परत आणा'
दावोसला जगभरातून लोक येत असतात. आतापर्यंत दावोसला जाऊन किती उद्योग आणले हे सर्वांना माहित आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणलेले गुजरातला गेले आहेत. ते प्रकल्प अगोदर परत आणा मग दाओसला जावा, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
मुंबईती आणलेले बरेच प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणलेले प्रकल्प आहेत. दावोसला जाण्यापेक्षा तुम्ही गुजरातला जावा, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.