Join us

'उन्हात असे कार्यक्रम घेणं चुकीचं, एखाद्याला वापरुन फेकून देणं ही भाजपची विशेषता'; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 7:01 PM

दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी उष्माघाताने १३ जणांचा मृ्त्यू झाला.

मुंबई- दोन दिवसापूर्वी खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी उष्माघाताने १३ जणांचा मृ्त्यू झाला. आता या घटनेची चौकशी होणार आहे. आज या संदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यावर आजा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर टीका केली.  "उन्हात असे कार्यक्रम घेणे चुकीच आहे, खारघर मधील दोषींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे,  एखाद्याला वापरुन फेकून देण्याच काम भाजपची विशेषता आहे, अशी टीका आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. 

खारघर घटनेची चौकशी होणार, एक सदस्यीय समिती नियुक्ती; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने ज्यांना मतदार बनवायचे होते, त्यांचाच बळी घेतला. फक्त मतांसाठी भाजपने असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमावर सरकारने केलेला खर्च कुठे गेला, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. 

खारघरच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे. नुकतेच काँग्रेसनेही राज्यपालांना या घटनेबाबत विशेष अधिवेशन बोलावून निष्काळजीपणा केलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. विरोधकांकडून खारघरमधील घटनेला सरकारला जबाबदार धरलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मागणी करण्यात येत आहे. आता, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती दिली.   

खारघर (जि. रायगड) येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरिता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात येत आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल. एका महिन्याच्या मुदतीत ही समिती याबाबतचा अहवाल सादर करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरद्वारे दिली. तसेच, भविष्यातील अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी, दक्षता घ्यावी, याबाबतही ही समिती शासनास शिफारशी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाभाजपाएकनाथ शिंदे