मुंबई : राज्य सरकारच्या ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत वाहतुकीच्या कोणत्याही मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी ४८ तासांच्या आतील हा अहवाल असावा, अशा सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत. याआधी १८ एप्रिल आणि १ मे रोजीच्या आदेशानुसार केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली एनसीआर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या संवेदनशील उत्पत्तीच्या राज्यांमधून येणाऱ्या व्यक्तींना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. मात्र आता देशभरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता हे आदेश देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू असणार आहेत. परराज्यातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आपल्या प्रवासादरम्यान कोरोना रोखण्यासाठी घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:06 AM