वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक
By admin | Published: September 22, 2015 02:20 AM2015-09-22T02:20:01+5:302015-09-22T02:20:01+5:30
धर्मादाय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक असून
मुंबई : धर्मादाय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक असून, जी रुग्णालये अशी माहिती देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
धमार्दाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. धर्मादाय संघटना अधिक प्रभावी व गतिमान होण्यासाठी तसेच दुर्बल घटकातील रुग्णांबाबत उपाययोजना याविषयी विश्वस्त संस्थांमध्ये ‘लिगल प्रोव्हिजन अवेरनेस’ येण्यासाठी नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे निमंत्रणही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
सध्या राज्यात नोंदणीकृत साडेसात लाख धमार्दाय विश्वस्त संस्था असून त्यापैकी साडेतीन लाख विश्वस्त संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी ८० हजार संस्था मोठया स्वरुपाच्या असून या संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर या कार्यशाळेत विश्वस्त संस्थांना अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.