'भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझं स्पष्ट मत'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 06:24 PM2021-02-21T18:24:13+5:302021-02-21T18:36:28+5:30

भाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं.

"It is my clear view that the BJP government will set aside reservations in the near future.", Jitendra Ahwad | 'भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझं स्पष्ट मत'

'भाजपा सरकार येणाऱ्या काळात आरक्षण बाजूला काढेल, हे माझं स्पष्ट मत'

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं.

ठाणे - अंबरनाथ बदलापूरमधील पाण्याचा प्रश्न किती उग्र आहे, येथील महिलांना त्याची पूर्ण कल्पना आहे. आपले ठाण्याचे खासदार कधी आले इकडे, कुणी सांगेल का? असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी ठाण्यातील शिवसेना नेत्यांवर नाव न घेता टीका केली. तसेच, पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवरही टीका केली, पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन एकेकाळी ज्येष्ठ कलावंतापासून ते अनेकांनी काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. पण, आज सगळे चडीचूप आहेत. भाजपासरकारमध्ये एकाधिकारशाही असल्याचे सांगत हे सरकार आरक्षणविरोधी असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.  

आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाणे आणि नवी मुंबईतील जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम आणि उद्घाटन सोहळ्यांना हजेरी लावली. यावेळी, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते. अंबरनाथ-बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाड बोलत होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपाने 2012 पासून 2014 पर्यंत पेट्रोल दरवाढीवरुन कायम टीका केली, त्यावेळी स्मृती इराणी सर्वात पुढे होत्या, असे म्हणत हम करे सो कायदा या विचाराने हे सरकार चालू असल्याचं सांगितलं. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही आंदोलनजीवी शब्दावरुन आव्हाड यांनी टीका केली. गुरुदासपूरच्या निवडणुकीचा वृत्तांत सांगताना भाजपाचा तेथील पराभव हे वेगळेच संकेत असल्याचेही आव्हाड यांनी म्हटलं. आपल्यावर श्रेष्ठ नाटककार नरेंद्र मोदी हे भुलभुलैया करण्याचं काम करतात, मोदी सरकारने देशाच्या मालकीच्या कंपन्या विकण्याचा धडाकाचा लावलाय, येणाऱ्या काळात भाजप सरकार आरक्षण काढेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हळूच बाजूला सारेल, असं माझं स्पष्ट मत आहे, असेही आव्हाड यांनी म्हटलं. ज्या संविधानामध्ये आपल्याला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलाय, त्याचं संविधानातील अधिकार काढण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. आंदोलनजीवी को रोखना होगा, याचा अर्थ काय? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला. 

Web Title: "It is my clear view that the BJP government will set aside reservations in the near future.", Jitendra Ahwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.