दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक करायला हवी : डॉ. नीता शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:09 AM2021-09-04T04:09:12+5:302021-09-04T04:09:12+5:30

मुंबई : आजघडीला जगभर अंधत्व ही मुख्य समस्या बनली आहे. भारतात वर्षाला देशभर अंदाजे एक कोटी लोक मृत होत ...

It is necessary to create awareness about vision donation: Dr. Nita Shah | दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक करायला हवी : डॉ. नीता शहा

दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक करायला हवी : डॉ. नीता शहा

Next

मुंबई : आजघडीला जगभर अंधत्व ही मुख्य समस्या बनली आहे. भारतात वर्षाला देशभर अंदाजे एक कोटी लोक मृत होत असून, ०.५ टक्के हून कमी प्रमाणात डोळे जमा केले जातात. सध्या भारतात दरवर्षी सुमारे ५० हजार डोळ्यांचे दान केले जाते. त्यामुळे दृष्टिदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक करायला हवी, असे अग्रवाल आय हॉस्पिटलच्या क्लिनिकल सेवाप्रमुख डॉ. नीता शहा यांनी राष्ट्रीय दृष्टिदान पंधरवड्याच्या निमित्ताने सांगितले.

डॉ. नीता शहा म्हणाल्या की, भारतात डोळ्यांच्या बाहुलीवरील पारदर्शक पडद्याला झालेल्या इजेमुळे (कॉर्नियल ब्लाईंडनेस) अंदाजे २० लाख व्यक्ती दृष्टिहीन झाल्या आहेत. या विकारात दिरंगाई न केल्यास, वेळेवर प्रत्यारोपण उपचार झाल्यास एक-चतुर्थांशहून अधिक कॉर्नियल अंधत्वाची समस्या दूर होऊ शकते. शरिराच्या अन्य कोणत्याही इतर अवयवाप्रमाणे डोळ्याच्या कॉर्नियाचे दान मृत्यूपश्चात करणे शक्य आहे. दरवर्षी दहा हजार कॉर्नियल अंधत्वाची प्रकरणे अस्तित्वात असलेल्या केसमध्ये भर घालतात. त्यामुळे कॉर्नियल प्रत्यारोपणाला वार्षिक मागणी वाढत चालली आहे. दरम्यान, मागणी आणि पुरवठ्यातील दरी भरून काढण्यासाठी लोकांमध्ये दृष्टिदानाविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. तसेच थोडा-फार किंवा अगदीच नगण्य जनजागृती असल्याने, सामाजिक किंवा धार्मिक समजुती आणि अन्य कारणांस्तव आपल्या देशात दृष्टिदानाला फारसे महत्त्व नाही. या महान कार्याला विविध गैरसमजुती आणि अंधश्रद्धांचे ग्रहण लागल्याने हा मार्गामधील अडसर आहे.

दृष्टिदान कोण करू शकते?

दृष्टिदाता हा कोणत्याही लिंगाचा किंवा वयाचा असू शकतो. तरीही दात्याला एड्स, हेपेटायटीस बी आणि सी, रेबीज, सेप्टीसेमिया, ॲक्यूट ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग), टीटॅनस, कॉलरा आणि मेनेंजेटीस तसेच एन्सेफलिटीस यासारखे संसर्गजन्य विकार असू नयेत.

कशी असते प्रक्रिया

मृत्यूपश्चात सहा ते आठ तासांत डोळा काढून घेणे आवश्यक असते. डोळे काढून घेतल्यानंतर ते मूल्यांकनाकरिता आय बँकेत पाठवले जातात आणि त्यानंतर त्यांचे पुढील वितरण होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्रशिक्षित तज्ज्ञांकडून डोळ्याचे मूल्यमापन होते. प्रतीक्षा यादीत नमूद अंध व्यक्तींना पाचारण करण्यात येते. तातडीने डोळ्यांची गरज असलेल्यांना मार्गदर्शक तत्त्वांत नमूद प्रक्रियेच्या आधारे सेवा देण्यात येते.

Web Title: It is necessary to create awareness about vision donation: Dr. Nita Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.