Join us  

मतदारांशी थेट संवाद - खोट्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष विकासावर भर द्यायला हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 2:20 AM

तरुणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग

बेरोजगारीचा प्रश्न सोडवावाआवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी देशातील तरु णांनी विविध विषयांचे शिक्षण घेतले आहे; परंतु रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर देखील रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढली आहे. देशाचे भविष्य असलेले सुशिक्षित तरु ण व्यसनांच्या आहारी जाऊ लागले आहेत. रोजगार उपलब्ध झाल्यास देशाचा देखील विकास होणार आहे, त्यामुळे सरकार कोणाचेही येवो रोजगाराचा प्रश्न सुटायला हवा.- विशाल गोळे, नेरु ळसर्व घटकांना शिक्षणाची समान संधी हवीशिक्षणात असलेले आरक्षण काढून सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. यामुळे गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना देखील आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेता येईल. तसेच आपले भविष्य घडविता येणार आहे. याचा फायदा त्या विद्यार्थ्यांसह त्याच्या कुटुंबाचा दर्जादेखील सुधारण्यास मदत करेल. त्यामुळे अशा संधी देणारे सुशिक्षित लोकप्रतिनिधींचे सरकार देशात असणे आवश्यक आहे.- दिगंबर वर्पे, खारघरजनतेचा विकास करणारे सरकार हवेराजकीय पक्षांनी विकासाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवायला हव्यात. निवडणुकांसाठी घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे यामध्ये एकमेकांवर टीका करण्यापेक्षा कोणती विकासकामे करणार याबाबत जनतेला सांगायला हवे. कोणी काय केले कोणी काही नाही केले याबाबत जनता विचार करेल. राजकीय पक्षांनी उगाच नागरिकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची फसवणूक करता कामा नये. पक्षाची जनतेसाठी ध्येय धोरणे, विकासाचे मुद्दे काय आहेत हे पाहून लोक मतदान करतील.- राहुल भालेराव, तुर्भेमोफत शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावीदेशातील तरु ण मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित आहेत; परंतु नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याने बेरोजगार आहेत. सुशिक्षित तरु णांचीही संख्या जरी मोठ्या प्रमाणावर असेल तरी सर्वांनाच सरकारी नोकºया मिळणार नाहीत; परंतु खासगी ठिकाणी देखील नोकºया उपलब्ध करून देणारे सरकार हवे. सरकारच्या माध्यमातून सर्वांना शिक्षणाची मोफत संधी उपलब्ध झाली पाहिजे.- विजय देशमुख, कोपरखैरणेदेशातील नागरिकांचे प्रश्न सोडवातरु णांना नोकºया नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही त्यामुळे शेतकरी आणि तरु णवर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. कोणतेही सरकार येवो सरकारने देशातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडवायला हवेत. देशाचा तरु ण हा देशाचे भविष्य आहे त्यामुळे तरु णांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध असणे गरजेचे आहे.- प्रशांत पवार, वाशी

 

टॅग्स :मतदाननिवडणूक