शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही -  नरेंद्र मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 08:58 PM2018-02-18T20:58:38+5:302018-02-18T21:00:07+5:30

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही, असा विश्वास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केला.

It is not difficult to achieve any goal in Shivaji Maharaj's land - Narendra Modi | शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही -  नरेंद्र मोदी 

शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही -  नरेंद्र मोदी 

Next

मुंबई - शिवाजी महाराजांच्या भूमीवर कुठलेही लक्ष्य प्राप्त करणे कठीण नाही, असा विश्वास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्त केला. महाराष्ट्राचा होत असलेला विकास हा भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. 
ग्लोबल इन्वेस्टर समिट-मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले.  यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी देशाच्या वेगवान विकासासाठी आपल्या सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांचा उल्लेख केला.  त्यात गेल्या तीन वर्षांत 1400 अधिक निरुपयोगी कायदे संपवल्याचे आणि अर्थसंकल्पामधून ग्रामीण भागाच्या विकासासाठी घसघशीत आर्थिक तरतूद केल्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवर्जुन उल्लेख केला. सरकारच्या धोरणांमुळे  देशातील प्रत्येक घटक सशक्त होत आहे, असेही त्यांनी सांगितले.  
त्याआधी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर जेएनपीटीच्या चौथ्या बंदराचे मोदींनी उद्घाटन केले. त्यानंतर सभास्थळी उपस्थितांना मोदींनी संबोधित केले. मोदी म्हणाले, 2022पर्यंत नवी मुंबईचे चित्र पालटणार असून, हवाई वाहतूक, रस्ते वाहतुकीत मोठे बदल झालेले दिसतील. तसेच शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकासह सर्व महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.  
त्यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मोदींनी  देशात एव्हिएशन पॉलिसी नव्हती, आमच्या सरकारने पॉलिसी आणली. एव्हिएशन सेक्टरमधील सुधारणांमुळे देशातील पर्यटन क्षेत्रास चालना मिळणार असल्याचे सूतोवाच केले. देशात 450 खासगी सरकारी विमाने आहे. सरकारने 900 नवीन विमाने खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठं ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबई होणार आहे. 1997मध्ये अटलबिहारी सरकारने विमानतळांचे स्वप्न पाहिले होते. परंतु नंतरच्या सरकारने काहीही केले नाही. हा प्रोजेक्ट कागदावर होता. आम्ही सर्व अडथळे दूर करून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. लटकाना.. अटकाना.. पटकाना हे पूर्वीच्या सरकारचे धोरण होते, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला आहे.

Web Title: It is not difficult to achieve any goal in Shivaji Maharaj's land - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.