दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकत्र आले म्हणून विवाह करणे बंधनकारक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:08 AM2021-08-25T04:08:53+5:302021-08-25T04:08:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह करणे बंधनकारक नाही, असे ...

It is not obligatory to marry just because two people came together sexually | दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकत्र आले म्हणून विवाह करणे बंधनकारक नाही

दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकत्र आले म्हणून विवाह करणे बंधनकारक नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दोन व्यक्ती केवळ लैंगिकदृष्ट्या एकमेकांत गुंतल्या म्हणून त्यांनी एकमेकांशी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या तिघांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

कोणाशी लग्न करणे ही निवडीची बाब आहे. ती कोणावरही लादली जाऊ शकत नाही. केवळ दोन व्यक्तींनी एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवले म्हणून त्यांनी विवाह करणे बंधनकारक नाही, असे निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. पी. एम. गुप्ता यांनी नोंदवले.

तक्रारदार महिलेचे एका आरोपीवर प्रेम होते. जानेवारी २०२१ मध्ये आरोपी नंबर एकबरोबर विवाह केल्याचा दावा तक्रादार महिलेने केला. आरोपी नंबर दोन हे तिचे सासरे आहेत. आरोपी नंबर तीन हे आरोपीचे नंबर एकचा मित्र आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर भारतीय दंड संहिता ४९८ (अ) ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर एका महिन्याने महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबात तपासअधिकाऱ्याला सांगितले की, आरोपी नंबर एकने तिच्याशी विवाह केला नाही. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सहमती घेतली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६, ३७७ आणि ३१३ अंतर्गत गुन्हा नोंदवला. अटक होईल या भीतीने आरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने म्हटले की, २०१९ मध्ये गुन्हा नोंदवेपर्यंत महिलेने आरोपीबरोबर अनेक ठिकाणी भेट दिली व त्याच्याबरोबर राहिलीही. तक्रार केल्यानंतरही ती आरोपीबरोबर अनेक ठिकाणी गेली व ठाण्यातील अनेक हॉटेल्समध्ये त्याच्याबरोबर राहिली. सदर प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता आरोपीचे तक्रारदार महिलेबरोबर प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले आणि काही कारणास्तव त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले. त्यांच्यात असलेले शारीरिक संबंध हे एकमेकांच्या सहमतीनेच होते, हे निश्चित.

तक्रारदार ही सज्ञान आहे. सुशिक्षित आहे. त्यामुळे विवाहापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याचे परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव तिला आहे. आपली फसवणूक करून सहमती घेण्यात आल्याचे महिलेचे म्हणणे आहे. मात्र, तसे दर्शविणारे पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले.

Web Title: It is not obligatory to marry just because two people came together sexually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.