Join us

जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, अशोक चव्हाणांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:17 PM

बाळासाहेबांची शैली वेगळी होती, नुकताच त्यांच्यावरील सिनेमा आला. पण, बाळासाहेबांना जे जमलं ते उद्धवना जमेल असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मुंबई - महाआघाडी ही मूलभूत विचारसरणीच्या आधारावरच उभी राहिली आहे. महाआघाडीच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही आघाडीत घ्या, असे कुणी म्हटले तर ते शक्य आहे काय, असा सवाल करीत राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत घेण्यास माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट विरोध केला आहे. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर, बाळासाहेबांची शैली वेगळी होती, बाळासाहेब वेगळेच व्यक्तीमत्व होते. मात्र, जे बाळासाहेबांना जमलं ते उद्धवला जमेल असं नाही, असे म्हणत चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

बाळासाहेबांची शैली वेगळी होती, नुकताच त्यांच्यावरील सिनेमा आला. पण, बाळासाहेबांना जे जमलं ते उद्धवना जमेल असे म्हणता येणार नाही. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर चव्हाण यांनी एकप्रकारे टीकाच केली. तर, अॅक्सिटेंडल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात सर्व फॅक्ट चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत. काँग्रेसला निगेटीव्ह पद्धतीने प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या सिनेमांकडे केवळ करमणुकीचे माध्यम म्हणून पाहाता येईल. याचे अनुकरण होऊ शकत नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना केवळ करमणूक म्हणूनच पाहाता येईल, त्याचे अनुकरण होऊ शकत नाही. तसेच या चित्रपटाचा निवणुकांसाठी कुठलाही फायदा होणार नसल्याचे चव्हाण यांनी आपल्या बोलण्यातून सुचवले आहे. 

टॅग्स :अशोक चव्हाणउद्धव ठाकरेठाकरे सिनेमा