आता रेल्वे स्थानकांवरून अ‍ॅप कॅबद्वारे टॅक्सी मागविणे शक्य; पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 02:43 AM2019-12-01T02:43:29+5:302019-12-01T02:43:54+5:30

मध्य रेल्वे मार्गावरील पाच स्थानकांवर पुढील तीन वर्षांत पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर पुढील एका वर्षात अ‍ॅप कॅबसेवा या पाच स्थानकांवर सुरू होईल

It is now possible to call a taxi through the app cab at the train station | आता रेल्वे स्थानकांवरून अ‍ॅप कॅबद्वारे टॅक्सी मागविणे शक्य; पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध

आता रेल्वे स्थानकांवरून अ‍ॅप कॅबद्वारे टॅक्सी मागविणे शक्य; पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध

Next

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, ठाणे आणि कल्याण या स्थानकांच्या परिसरात पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पाच स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. यासह प्रवाशांना रेल्वे स्थानकांवरून बाहेर पडताच, पुढील प्रवासासाठी तत्काळ टॅक्सी मिळावी, यासाठी अ‍ॅप कॅबसेवेद्वारे टॅक्सी उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त सीएसएमटी स्थानकात पे अँड पॉर्किंगचे काम सुरू करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील पाच स्थानकांवर पुढील तीन वर्षांत पे अँड पॉर्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर पुढील एका वर्षात अ‍ॅप कॅबसेवा या पाच स्थानकांवर सुरू होईल. पे अँड पार्किंगसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस थांबा घेणाऱ्या ठिकाणी पे अँड पार्किंग सेवा उपलब्ध असेल, तर ठाणे ते एलटीटी या दरम्यानचे मध्यवर्ती स्थानक म्हणून भांडुप
येथे पे अँड पार्किंगची सेवा सुरू
होणार आहे.
प्रवाशांना आपल्या साहित्यासह एक्स्प्रेस, लोकलपासून ते टॅक्सी स्टँडपर्यंत जाणे कठीण होते. यासह टॅक्सी तत्काळ मिळत नसल्याने प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यासाठी अ‍ॅप कॅबसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सेवेद्वारे प्रवासी रेल्वे स्थानकाजवळ लगेचच टॅक्सी मागवू शकतात. टॅक्सीसाठी खास पार्किंगसाठी जागा तयार करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यास प्रवाशांना लगेच टॅक्सी उपलब्ध होईल.

असे असतील
पार्किंगचे दर
रेल्वेने तयार केलेल्या प्रस्तावानुसार दोन तासांकरिता सायकल पार्क करण्यासाठी ५ रुपये, दुचाकीला १० ते १५ रुपये, चारचाकी गाडीला २० ते ६० रुपये आकारण्यात येणार आहेत. स्थानकानुसार आणि गाड्यांच्या संख्येनुसार पार्किंगच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. दोन तासांपेक्षा जास्त वेळ पार्किंग केल्यास वेगळे दर आकारले जातील.

Web Title: It is now possible to call a taxi through the app cab at the train station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई