मुंबई-
मुंबईत अंधेरी पश्चिमेला कुणावर तरी आयकर विभागाची कारवाई सुरू आहे. कोण असावा हा नवा बजरंग खरमाटे??, असं ट्विट भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत भाजपाच्या भ्रष्टाचारी नेत्यांचे मुखवटे उघडे पाडणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी आयकर विभागानं मुंबईत शिवसेना नेत्यांच्या घरी धाडसत्र सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर ट्विटवर नेहमी सक्रीय असतात आणि शिवसेनेवर शरसंधान साधताना पाहायला मिळतात. आज सकाळी त्यांनी मुंबईत आयकर विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचं ट्विट केलं आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी आयकर विभाग संपूर्ण माहितीनिशी काम करत असतं त्यामुळे यात राजकारण आणण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जर तुम्ही काही चुकीचं केलं नसेल तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानं कारवाई होईलच, असं अतुल भातखळकर म्हणाले.
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर धाडमुंबईतील वांद्रे येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकवर्तीय समजले जाणाऱ्या राहुल कनाल यांच्या निवासस्थानावर आयकर विभागानं धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत वांद्र येथील अल्मेडा इमारतीत राहुल कनाल यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीबाहेर सकाळपासून केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात असून आयकर विभागाकडून कनाल यांच्या घरावर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.