कुलाबा ७७.४ मिमी
सांताक्रूझ ५९.६ मिमी
---------------
शहर ४९.६५ मिमी
पूर्व उपनगर ६८.०५
पश्चिम उपनगर ४८.८३
---------------
२०२१ पावसाची टक्केवारी
कुलाबा ६
सांताक्रूझ ७.२३
* येथे साचले पाणी
- हिंदमाता जंक्शन, सायन रोड क्रमांक २४, सायन पुलाखाली, मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला येथील गौरीशंकर नगर, अंधेरी सबवे, खार सबवे, मालाड सबवे यासह मुंबई शहर, उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले हाेते.
- कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वेची वाहतूक कुर्ला ते सीएसएमटी स्थानकादरम्यान बंद होती.
* ३ ठिकाणी घरांचा भाग काेसळला.
* १३ ठिकाणी शॉर्टसर्किट.
* बेस्टच्या मार्गांत बदल
बेस्टलाही पावसाचा फटका बसला. त्यानुसार, सायन रोड क्रमांक २४, मानखुर्द रेल्वे स्थानक, गांधी मार्केट आणि अॅन्टॉप हिल येथे बेस्टच्या वाहतुकीचे मार्ग वळविण्यात आले होते.
* जलमय झाले क्रांतीनगर
कुर्ला पश्चिमेकडील बैल बाजार येथील मिठी नदीलगत वसलेल्या क्रांतीनगर परिसरात नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे पहिल्याच पावसात क्रांतीनगरमधील रहिवाशांच्या घरात आणि घराच्या परिसरात पाणी साचले होते.
.................................