Join us

परमबीर सिंग यांची याचिका दाखल करून घेण्या योग्य की अयोग्य?; ५ एप्रिलला निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 8:37 PM

Parambir Singh : याचिका दाखल करून घेण्यात आली तरच पुढे सुनावणी घेण्यात येईल.

ठळक मुद्देतपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत आहे. न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या  याचिकेवर ३१ मार्च रोजी सुनावणी होती. 

मुंबई :  गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केली आहे. ही याचिका दाखल करून घेण्यायोग्य आहे की नाही, यावर उच्च न्यायालय ५ एप्रिल रोजी निकाल देणार आहे. याचिका दाखल करून घेण्यात आली तरच पुढे सुनावणी घेण्यात येईल.

 

सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना  दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थानपनांद्वारे कमावण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टींगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत आहे. न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या  याचिकेवर ३१ मार्च रोजी सुनावणी होती. तब्बल सहा तास सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, यावरील निकाल राखून ठेवला.आता ५ एप्रिल रोजी यावरील निर्णय देण्यात येणार आहे.

 

सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करू घेण्यावर आक्षेप घेतला. सिंह यांचे या याचिकेत स्वतःचे दडले आहे. त्यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी ही याचिका दाखल केली. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची  जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली. तसेच त्याशिवाय दाखल करण्यात आलेल्या अन्य तीन याचिकांवर ५ एप्रिल रोजी निकाल देण्यात येणार आहे. 

टॅग्स :परम बीर सिंगअनिल देशमुखउच्च न्यायालयसचिन वाझेमुंबईमहाराष्ट्र