सरनाईक यांनी टॉप ग्रुपच्या माध्यमातून हवालामार्फत पैसे परदेशात हस्तांतरण केल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:17 AM2020-11-26T04:17:32+5:302020-11-26T04:17:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी टॉप ग्रुपच्या माध्यमातून हवालामार्फत पैसे परदेशात हस्तांतरण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी टॉप ग्रुपच्या माध्यमातून हवालामार्फत पैसे परदेशात हस्तांतरण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मनी लॉण्ड्रिंग अंतर्गत बोगस खाती व कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे ३५० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यासाठी एक दिवसाचा अवधी असताना सेना आमदारावर केलेल्या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याबाबत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप - प्रत्यारोपाची राळ उठली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना रणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवला होता. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच कोंडी करण्यासाठी कारवाई केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.