'शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा'

By महेश गलांडे | Published: December 23, 2020 11:14 AM2020-12-23T11:14:10+5:302020-12-23T11:42:30+5:30

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ''अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे.

It is unfortunate that Baliraja has to agitate on Farmers' Day, sharad pawar on twitter | 'शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा'

'शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा'

googlenewsNext
ठळक मुद्दे'अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतंय.''

नवी दिल्ली - देशभरात आज राष्ट्रीय किसान दिवस साजरा होत आहे, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. मात्र, दुर्दैवाने राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर शेतकऱ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या 26 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत उभं राहून सरकारला घाम फोडत आहेत. या आंदोलनाचा धागा पकडतच माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि खासदार शरद पवार यांनी बळीराजाला न्याया मिळावा हीच सदिच्छा व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ''अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतंय. देशाच्या बळीराजाला न्याय मिळावा हीच राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो.'', असे ट्विटर पवार यांनी केलंय. अद्यापही शेतकरी आंदोलन थांबविण्यात केंद्र सरकारला यश आले नसल्याने पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्यांची पुढील रणनिती आज ठरणार

सरकारने शेतकरी संघटनांना पाठविलेल्या पत्रावर संयुक्त किसान मोर्चा आज बुधवारी सकाळी बैठक घेत असून लेखी प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत शेतकरी आहेत. दरम्यान आज आंदोलनाच्या २७ व्या दिवशीही शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते जाम केलेत. एका तरुण शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांकडून लेखी उत्तर पाठविले जाणार आहे. 
 
राहुल गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीचे २ कोटी सह्यांचे निवेदन यावेळी ते राष्ट्रपतींना देणार आहेत. 

Web Title: It is unfortunate that Baliraja has to agitate on Farmers' Day, sharad pawar on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.