एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 05:13 AM2020-05-15T05:13:56+5:302020-05-15T05:14:53+5:30

पक्षाच्या विस्तारासाठी खडसे यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना अशी वागणूक मिळणे दु:खद आणि दुर्दैवी असून त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही

It is unfortunate that this happened with Eknath Khadse - Gadkari | एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

एकनाथ खडसेंबाबत असे घडणे दुर्दैवी - गडकरी

googlenewsNext

मुंबई : एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये उपेक्षा चालवली जात असल्याबद्दल केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. खडसे यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अशी वेळ येणे दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.
ते म्हणाले की, पक्षाच्या विस्तारासाठी खडसे यांनी खूप प्रयत्न केले. त्यांना अशी वागणूक मिळणे दु:खद आणि दुर्दैवी असून त्यापेक्षा जास्त मला काही बोलता येणार नाही, असेही गडकरी म्हणाले.

माजी मंत्री राम शिंदे यांचा पाटील, पंकजा यांना टोला
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना ट्विटरवरुन टोला हाणला. विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले नेते, उमेदवार समजून घेतील आणि शिकतील अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती. शिंदे यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांत चांगला अभ्यास केला. त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. ते मला व इतरांना जमलं नाही.

खडसे यांचा हल्लाबोल
खडसेंच्या घरात किती पदे द्यायची?, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्याचा समाचार घेताना खडसे म्हणाले की, माझ्या मुलीने मुक्ताईनगरमध्ये तिकीट मागितले नव्हते. माझ्यासारखा स्पर्धक नको म्हणून जबरदस्तीने माझ्या मुलीला उमेदवारी देण्यात आली.

Web Title: It is unfortunate that this happened with Eknath Khadse - Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.