Join us

अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 6:04 AM

संबंधित पोलीस घटक प्रमुखांकडून सेवाविषयक अडचणी, समस्यांबाबत पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ

जमीर काझीमुंबई : संबंधित पोलीस घटक प्रमुखांकडून सेवाविषयक अडचणी, समस्यांबाबत पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन दाद मागणाºया पोलीस अधिकारी, अंमलदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. सध्या कार्यरत असलेल्या घटकातील प्रमुखांच्या संमतीनंतरच वरिष्ठांची भेट घेता येणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या मागणीसंदर्भातील अर्जावर घटक प्र्रमुखाने अभिप्राय दिल्यानंतरच त्याबाबत पुढील निर्णय होणार आहे. पोलीस मुख्यालयात वरिष्ठांना भेटण्यासाठी येणाºया पोलिसांसाठी हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. बुधवारी त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले.बहुतांश पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना कौटुंबिक, पाल्यांच्या शिक्षणाच्या कारणास्तव सोयीच्या ठिकाणी बदली, प्रतिनियुक्ती हवी असते. अशा पोलिसांच्या पदोन्नतीला विलंब होत असल्यास ते पोलीस मुख्यालयात येऊन महासंचालक किंवा आस्थापना विभागाचे अपर महासंचालक, विशेष महानिरीक्षक यांची भेट घेऊन गाºहाणे मांडतात. पोलीस महासंचालकांनी कामासाठी यापूर्वी दर आठवड्याला शुक्रवार निश्चित केला होता. महिन्याभरापूर्वी आस्थापना विभागाचा कार्यभार स्वीकारलेल्या अपर महासंचालक संदीप बिष्णोई यांनी त्यात आता बदल केला आहे. यापुढे आस्थापना विभागातील कामासंदर्भात अधिकारी, कर्मचाºयांना दर आठवड्यात सोमवार व शुक्रवारी दुपारी अडीच ते सहा वाजेपर्यंतची वेळ निश्चित केली आहे. मात्र भेटीला येण्यापूर्वी संबंधिताने सध्या कार्यरत असलेल्या घटकप्रमुखाला कल्पना देत विनंती अर्ज देऊन लेखी अभिप्राय घेणे बंधनकारक केले आहे. त्यानंतरच संबंधित पोलीस मुख्यालयात वरिष्ठ अधिकाºयांना भेटीसाठी येता येणार आहे. जर त्यांच्याकडे वरिष्ठांच्या भेटीवेळी संबंधित घटक प्रमुखांचा अभिप्राय नसेल तर मुख्यालयाकडून त्यांच्याकडे अर्ज पाठविला जाईल. घटकप्रमुखाने मत नोंदविल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांकडून संबंधितांच्या अर्जावर निर्णय घेतला जाईल.तत्काळ अभिप्राय द्यावेतसेवाविषयक कामासाठी वरिष्ठ अधिकाºयांना भेटण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नियमित मुख्यालयात येत असतात. त्यांनी विनंती अर्जावर संबंधित घटकप्रमुखांचा अभिप्राय घेतल्यास त्यासंबंधी झटपट निर्णय घेणे शक्य आहे. पोलिसांच्या अर्जावर तत्काळ अभिप्राय नोंदविण्याची सूचना घटकप्रमुखांना करण्यात आली आहे.- संदीप बिष्णोई, अपर महासंचालक, आस्थापना