...तर मोठी शिक्षा होते, हे माहीत नव्हते- श्यामवर राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:59 AM2017-12-13T00:59:45+5:302017-12-13T01:00:00+5:30

बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असते त्याहीपेक्षा मोठी शिक्षा हत्येच्या गुन्ह्यासाठी असते, याबद्दल मला माहीत नव्हते, अशी माहिती शीना बोरा हत्येमधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर व या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याने सोमवारी न्यायालयाला दिली.

... it was a big punishment, I did not know - Shyamvar Rai | ...तर मोठी शिक्षा होते, हे माहीत नव्हते- श्यामवर राय

...तर मोठी शिक्षा होते, हे माहीत नव्हते- श्यामवर राय

Next

मुंबई : बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा असते त्याहीपेक्षा मोठी शिक्षा हत्येच्या गुन्ह्यासाठी असते, याबद्दल मला माहीत नव्हते, अशी माहिती शीना बोरा हत्येमधील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर व या खटल्यातील माफीचा साक्षीदार श्यामवर राय याने सोमवारी न्यायालयाला दिली.
२१ आॅगस्ट २०१५ रोजी खार पोलिसांनी श्यामवर रायला बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. या घटनेप्रकरणी तपास अधिकारी त्याची चौकशी करत असताना त्याने शीना बोरा हत्येचे बिंग फोडले आणि घटनेने नवीन वळण घेतले. या प्रकरणी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांना अटक केली. गेले पाच महिने इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी श्यामवर रायची उलटतपासणी घेतली. काहीच दिवसांपूर्वी इंद्राणीच्या वकिलांनी आपली उलटतपासणी संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर आता संजीव खन्नाच्या वकिलांनी रायची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली आहे. ‘बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल जी शिक्षा मिळते त्याहीपेक्षा मोठी शिक्षा हत्या केल्यानंतर मिळते, याबद्दल मला माहीत नव्हते. हत्या करणाºयाला शिक्षा ठोठावण्यात येते, हे मला माहीत होते,’ असे राय याने संजीव खन्नाच्या वकिलांनी घेतलेले उलटतपासणीत विशेष सीबीआय न्यायालयाला सांगितले.
१९९७पासून राय मुंबईत ड्रायव्हरचे काम करत आहे. त्यामुळे संजीव खन्ना याच्या वकिलांनी रायला शहरात घाईगर्दीच्या वेळी किती वाहतूककोंडी असते, त्याच्या घराच्या आजूबाजूला असलेले गटार, नाला, खारफुटी आणि पोलीस स्टेशनबाबत उलटसुलट प्रश्न केले. घाईच्या वेळी वरळी ते वांद्रे एस. व्ही. रोडवरून जाण्यास किती वेळ लागतो, असा प्रश्न केल्यावर रायने सुमारे १० ते १५ मिनिटे लागतात, असे उत्तर न्यायालयाला दिले.
संजीव खन्नाच्या वकिलांनी रायला शीनाचा भाऊ मिखाईल व त्याच्यात झालेले संभाषण आठवण्यास सांगितले. रायने हे संभाषण आठवत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

Web Title: ... it was a big punishment, I did not know - Shyamvar Rai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.