Join us

एकनाथ शिंदेंनी तेव्हाच बंडाचा पहिला प्लॅन केला होता, पण....; नितीन देशमुखांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 5:42 PM

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी शिवसेनेतील बंडा संदर्भात मोठा खुलासा केला आहे.

मुंबई- शिवसेनेत बंड होऊन जवळपास एक वर्ष झालं. सेनेतील ४० पेक्षा अदिक आमदारांनी बंड करत शिंदे- फडणवीस सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. दरम्यान, आता या बंडा संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. शिवसेनेचे बंड अगोदरच अयोध्या येथे होणार होते. पण, हे बंड फसले, असा खुलासा देशमुख यांनी केला. 

शिंदे मुख्य़मंत्री होणार हे आम्हाला माहिती होते, पण फडणवीसांना नव्हते; नितिन देशमुखांचे मोठे गौप्यस्फोट

आमदार नितीन देशमुख यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे. आमदार देशमुख म्हणाले, आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाताना सर्वच आमदारांना घेऊन जायच ठरलं होते.  तिथेच सर्व आमदारांना ठेवण्याचा प्लॅन सुरू होता कारण उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार होते. त्यावेळी मला याची कुणकुण लागली होती. एका आमदाराने माझंही तिकिट काढलं होतं. पण, तो प्लॅन तिथेच फसला, असा मोठा खुलासा आमदार देशमुख यांनी केला आहे. 

यावेळी देशमुख यांनी आणखी मोठे गौप्यस्फोट केले. देशमुख यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार आहेत, याची कल्पना एका महिनाच आम्हाला आली होती. तेव्हा कदाचित देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती नसेल. मात्र, स्वत: एकनाथ शिंदेंनीच मला ते मुख्यमंत्री होणार आहेत, असे सांगितले होते, असा दावा देशमुख यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना बंड आणि सत्तांतर होईल हे माहिती होते, परंतू मुख्यमंत्री कोण होईल हे माहिती नव्हते, असे देशमुख म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की शिंदेंना त्यांनी मुख्यमंत्री बनविले हे पूर्णपणे खोटे आहे. कारण केवळ अमित शाह आणि शिंदे या दोघांनाच हे माहिती होते, असा गौप्यस्फोट देशमुख यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच पहिल्या सहा महिन्यांत कटकारस्थाने सुरु झाली होती, असे देशमुख म्हणाले. 

टॅग्स :शिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरेनितीन देशमुख