Join us

असा तयार होणार सूर्या, हात नदीवरील पूल

By admin | Published: March 17, 2015 11:03 PM

अभियंत्यासमोर आव्हान असले तरी दोन्ही पूल हे ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच उभारण्याचा निर्धार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

पंकज राऊत ल्ल बोईसरतारापूर एमआयडीसी (बोईसर) ते मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मुख्य व प्रचंड वाहतुकीच्या रस्त्यावरील सूर्या व हात अशा दोन नद्यांवर अद्यावत तंज्ञज्ञानाद्वारे पूल बांधण्यात येत असून सूर्या नदीच्या वाहत्या पाण्यात पूल बांधणे हे एक अभियंत्यासमोर आव्हान असले तरी दोन्ही पूल हे ठरवून दिलेल्या मुदतीपूर्वीच उभारण्याचा निर्धार एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.सूर्या नदीवरील पुलाची उंची दिडशे मीटर असून रूंदी २०.७० मीटर तर उंची १४ ते १५ मीटर असणार आहे. पुलावर साडेसात - साडेसात मीटरचे प्रत्येकी दोन व एकूण चार पदरी रस्ता असणार असून रस्त्याच्या दोन्ही बाजुला पदपथ व मध्यभागी डिव्हायडर व स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहेत. सदर पुलावरून तारापुर अणुऊर्जा केंद्र, भाभाअणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) व तारापुर एमआयडीसी या तिन्ही प्रकल्पात प्रचंड अवजड ट्रेलर व वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करतील याची जाणीव ठेवून त्या क्षमतेचा प्री स्ट्रेस्ड बॉक्स गर्डर्सचा हा पूल असणार असून नॉन सबमरसिबल हाय हाईट मेजर पूल आहे.सूर्या नदीवरील पूल बांधणीचा अंदाजीत खर्च अठरा कोटी चाळीस लाख तर हात नदीवरील पुलाचा खर्च पाच कोटी शेहेचाळीस लाख होणार असून दोन्ही पूल बांधणीचे काम हे व्हीयुबी मनोजा (मुंबई) हे जॉर्इंट व्हेंचरमध्ये करीत असून हात नदीवरील पुल मे २०१५ अखेर पर्यंत तर सुर्या नदीवरील पुलाचे बांधकाम १५ जुन २०१७ पर्यंत पुर्ण करण्याची मुदत असली तरी ते पुढील वर्षाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत करण्याचा संकल्प एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला असून सध्या दोन्ही पूलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून सदर दोन्ही पूल कार्यान्वित झाल्यानंतर या रस्त्यावरून धावणाऱ्या सुमारे बारा हजार वाहनांना त्याचा फायदा होणार आहे.या पुलाच्या दोन्ही बाजूने (सुरूवात व शेवट) दोन अबेटमेंट (बाजूचे मुख्य आधार स्तंभ) व एकूण तीन पीलर्स असणार असून दोन पिलर्समधील अंतर ३७.५० मिटरचे एकूण चार स्पॅन असणार आहेत. तर अबेटमेंट व पिलर्सतर ३७.५० मीटर लांबीचे व अडीच मीटर रूंदीचे आठ बॉक्स गर्डर बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक पिलर्सची रूंदी १.२ मीटर असणार आहे. पुलाच्या वरच्या बाजूला एमआयडीसीची जॅकवेल आहे तर खालच्या अंगाला विअर असल्याने तेथे बारमाही कमीतकमी चार मीटर पाणी स्थिर राहते याचाही पूल बांधताना गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. पूल उभारताना संपूर्ण आर.बी.सी. एम ४० ग्रेड चे काँक्रीट तर टीएमटी आणि फ्यूजन बॉन्डेड इपॉक्सी कोटींगच्या स्टीलचा वापर करण्यात येणार असून आयआरसी क्लास ७० आरच्या भूकंप रोधीत क्षमतेचा हा पूल बांधताना विचारात घेतला जाणार आहे. पिलर्स व अबेटमेंटचे बांधकाम करण्यापूर्वी नदीचे वाहते पाणी अडविण्याकरीता मातीचा मोठा बंधारा घालण्यात आला आहे तर सात ते आठ हजार मातीच्या गोणी प्रोटेक्ट एम्बँक्टमेंटसाठी एकावर एक अशा रचून ठेवण्यात आल्या आहेत. पिलर व अबेटमेंट करीता फुटींग ५ बाय ८ मीटर तर खोली १.५ मीटरची असणार आहे.