मध्य रेल्वेची फाईल शेअरिंग सिस्टीम सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सोपे होणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी यासाठी साेमवारी फाईल शेअरिंग सिस्टीम सुरू केली असून, त्याचा फायदा अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे.
देशभर पसरलेल्या कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना मुख्यालय आणि विभागीय अधिकाऱ्यांमध्ये वेगवान, विश्वासार्ह आणि सामायिक पातळीवर डेटा सामायिकीकरण करण्यासाठी फाईल शेअरिंग सिस्टीम (एफएसएस) हे एक सुलभ साधन आहे. मध्य रेल्वेच्या आयटी केंद्राशी समन्वय साधून टेलिकॉम विभागाने या प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. मुख्यालयात उपमुख्य अधिकारी आणि विभागीय पातळीवर शाखा अधिकारी स्तरापर्यंत सामायिक फोल्डरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
* घरून काम करणे ही सध्याची गरज
कोरोनाच्या काळात घरून काम करणे ही सध्याची गरज बनलेली आहे. त्यासाठी फाइल शेअरिंग सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे डेटा आदानप्रदान आणि माहिती गोळा (एकत्र/जमा) करण्यास प्रोत्साहन मिळेल.
- आलोक कंसल, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
-----------------------------