‘ते’ पाच दिवस होणार सुसह्य!

By admin | Published: April 21, 2017 12:58 AM2017-04-21T00:58:24+5:302017-04-21T00:58:24+5:30

स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येते ती जणू एक डोकेदुखी बनून जाते.

'It' will be five days! | ‘ते’ पाच दिवस होणार सुसह्य!

‘ते’ पाच दिवस होणार सुसह्य!

Next

मनोहर कुंभेजकर, मुंबई
स्त्रीत्वाचा अविभाज्य घटक म्हणजे मासिक धर्म होय. शाळेत शिकताना, उमलत्या वयात जेव्हा पाळी येते ती जणू एक डोकेदुखी बनून जाते. एकदा पाळी आल्यानंतर ती पुढच्या महिन्यात नियमित वेळेला येईलच असे नाही. त्यातच कित्येक जणी सॅनिटरी पॅड्सही वापरत नाहीत. मात्र प्रत्येकीने आरोग्याकडे लक्ष देणेही गरजेचे ठरते. नेमकी हीच बाब हेरून वर्सोवा येथील आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी एक मोलाचे पाऊल उचलले आहे.
या गंभीर विषयावर महिला आमदार म्हणून डॉ. लव्हेकर यांनी सातत्याने विधानसभेत आवाज उठवला. विशेष म्हणजे त्यांच्या या योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयात सहकार्य केले. वर्सोवा मतदारसंघातील शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, मेट्रो स्टेशन, झोपडपट्टी, पोलीस ठाणे, मतदारसंघातील महापालिका कार्यालये, गृहनिर्माण संस्था आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणी ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.
वर्सोवा, यारी रोड येथील चिल्ड्रेन वेल्फेअर सेंटर हायस्कूल आणि क्लारा कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये आॅटोमॅटिक सॅनिटरी पॅड एटीएम आणि डिस्पोजल मशीन या योजनेतून बसवण्यात येणार आहेत. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. या वेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, अभिनेत्री निशिगंधा वाड, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा अगरवाल, संगीत दिग्दर्शिका कामिनी खन्ना, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुचेता दिघे, प्राचार्य अजय कौल यांची उपस्थिती असेल.
‘डॉटर्स आॅफ वर्सोवा’ या योजनेसाठी काही सामाजिक संस्थांनीही मोलाचे योगदान दिलेले आहे. या योजनेंतर्गत जेथे महिलांची संख्या लक्षणीय आहे, अशा सार्वजनिक ठिकाणी आॅटोमॅटिक सॅनिटरी पॅड व्हेंडिंग एटीएम मशीन्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. महिलांना प्रिपेड स्मार्ट कार्ड दिले जाणार असून, त्याचा वापर नॅपकिन व्हेंडिंग मशीन्समधून काढण्यासाठी केला जाणार आहे. त्याचबरोबर सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट हीसुद्धा गंभीर आरोग्य विषयक समस्या बनली आहे. त्यावर तोडगा म्हणून नॅपकिन डिस्पोझल मशिन्ससुद्धा बसवण्यात येतील, अशी माहिती आमदार डॉ. लव्हेकर यांनी दिली.

Web Title: 'It' will be five days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.