Aditya Thackeray: दिल्लीतून २०२४ नंतर मोठा फंड आणणे शक्य होईल; आदित्य ठाकरे यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:18 PM2022-02-17T22:18:12+5:302022-02-17T23:40:12+5:30
कल्याण-डोंबिवली आपली मावशी असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई: विकासासाठी फंड मिळावा यासाठी आतुरतेने वाट पहावी लागत होती. मात्र आपल्या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर फंड आणला जात आहे. दिल्लीतून देखील फंड आला पाहिजे, असं विधान मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
कल्याणडोंबिवली महापालिकेच्या विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे तसेच स्मार्ट सिटी डेवलपमेंटच्या माध्यमातून नदी किनारा विकसित करणे, डायलिसीस सेंटरचे उद्घाटन आणि औद्योगिक क्षेत्रातील ५५ कोटीच्या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामाचे उद्घाटन आज आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
KDMC च्या मुख्यालयातील महापालिका भवन येथे नुतनीकरण करण्यात आलेल्या 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' सभागृहाचे उद्घाटन केले pic.twitter.com/JW9SG7ruip
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 17, 2022
शिवसेना इतर राज्यात पण शिवसेना निवडणूक लढत आहे. त्यामुळे २०२४ नंतर दिल्लीतून देखील शिवसेना खासदारांना असाच मोठा फंड आणणे शक्य होईल, असं सूचक विधान करत आदित्य ठाकरे यांनी केलं. शिवसेनेचे २०२४चे लक्ष दिल्ली असल्याचा सूचक इशारा मंत्री आदित्य ठाकरे यांनी या विधानावरुन दिला आहे. तसेच कल्याण- डोंबिवली शहराकडे आपले विशेष लक्ष असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मुंबई ही आपली आई, तर कल्याण-डोंबिवली आपली मावशी असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
मुंबई: मुंबई ही आपली आई, तर कल्याण-डोंबिवली आपली मावशी- मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे pic.twitter.com/RB8dNj0XMP
— Lokmat (@lokmat) February 17, 2022