Join us

तीन दिवस पाऊस पडणार; तापमानही चढेच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 8:24 AM

पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केरळात दाखल झालेला मान्सून राज्यात येण्यास अवधी असला तरी हवामानात होत असलेल्या बदलामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांना पुढील तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होईल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे.

१० जून : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. शिवाय पाऊस पडेल. ११, १२ आणि १३ जून रोजी याच जिल्ह्यांत कमी- अधिक फरकाने हीच परिस्थिती राहील.

कुठे किती पारा? 

जळगाव     ४२ परभणी     ४१ नांदेड     ४१ बीड     ४० सोलापूर     ३९ पुणे     ३७ नाशिक     ३७ सांगली     ३६ सातारा     ३६ मुंबई     ३६

 

टॅग्स :पाऊसउष्माघात