वडाळा ते सीएसएमटी मेट्रो रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 02:39 AM2019-07-24T02:39:28+5:302019-07-24T02:39:37+5:30

याचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होईल.

 It will run CSMT metro rail from Wadala | वडाळा ते सीएसएमटी मेट्रो रेल्वे धावणार

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो रेल्वे धावणार

Next

मुंबई : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई मेट्रो मार्ग-११) या मेट्रो मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास, प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली.

या मार्गाची लांबी १२.७७४ किमी आहे. पैकी वडाळा ते शिवडी ४ किमीचा उन्नत मार्ग तर शिवडी ते सीएसएमटी ८.७६५ किमीचा भुयारी मार्ग असेल. यामध्ये २ उन्नत आणि ८ भुयारी अशी १० स्थानके असतील. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे ८ हजार ७३९ कोटी आहे. मार्च २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्तीचे उद्दिष्ट आहे. एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्या सहयोगातून तो पूर्ण केला जाईल. जागतिक बँक, न्यू डेव्हलपमेंट बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था आदी आंतरदेशीय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्जसाहाय्य घेणे या बाबींना मंजुरी मिळाली आहे.

याचा फायदा मुख्यत्वाने मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पुनर्विकसित होणाऱ्या क्षेत्राला होईल. हा मार्ग घड्याळ गोदी, मुंबई जनरल पोस्ट आॅफिस, मुंबई पालिका या ऐतिहासिक वारसा इमारतींच्या बाजूने भूमिगत असेल. मुंबई पुरातन वारसा जतन समितीकडून (मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटी) लवकरात लवकर मंजुरी देण्याची शिफारसही मान्य केली आहे. वडाळा ते सीएसएमटी प्रकल्प हा मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासारवडवली) आणि ४ अ (कासारवडवली ते गायमुख) यांचा दक्षिणेकडे विस्तारित होणारा भाग आहे. वडाळा ते सीएसएमटीमुळे मुंबई पोर्ट ट्रस्ट पुनर्विकसित परिसरातील नागरिकांना फायदा होईल. सीएसएमटी हे थेट ठाणे-घोडबंदर व मीरा-भार्इंदरला जोडले जाईल. सोबत मेट्रो ३ चे सीएसएमटी स्थानक, हार्बर रेल्वेचे शिवडी स्थानक, मोनारेलचे भक्ती पार्क स्थानक येथे प्रवाशांना मार्ग अदलाबदल करणे सहज शक्य होईल.

Web Title:  It will run CSMT metro rail from Wadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो