Mumbai Plane Crash: घाटकोपर येथील विमान अपघाताची चौकशी करणार, घटनास्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2018 06:41 PM2018-06-28T18:41:06+5:302018-06-28T18:41:26+5:30
घाटकोपर येथे झालेल्या चार्टर्ड विमान अपघाताची गंभीर दखल घेत या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई - घाटकोपर येथे झालेल्या चार्टर्ड विमान अपघाताची गंभीर दखल घेत या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. घाटकोपर येथील विमान अपघातस्थळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भेट दिली आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतान फडणवीस यांनी ही घोषणा केली. घाटकोपर येथील सर्वोदय रुग्णालय परिसरात चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
अपघातस्थळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा अपघात चिंताजनक आहे. या अपघाताची कारणे शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्यात येईल, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल,"
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis visits the site of chartered plane crash in Mumbai's Ghatkopar, says, "It is a worrying incident. What were the reasons behind the crash and who is responsible for it needs to be found out." 5 people lost their lives in the crash. pic.twitter.com/G6Aj1VT9UK
— ANI (@ANI) June 28, 2018
घाटकोपर येथील विमान दुर्घटनेत वैमानिकासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपर पश्चिमेकडच्या जीवदया लेनमधल्या पृथ्वी बिल्डिंगजवळ हा अपघात झाला आहे. सदरचे चार्टर्ड विमान हे जुहू येथून टेस्टिंगसाठी नेत असतानाच हा अपघात झाला होता.