मुंबई : राज्यातील आयटीआयची वाढती मागणी लक्षात घेता आगामी शैक्षणिक वर्षापासून ५० हजार जागा वाढविण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील -निलंगेकर यांनी दिली.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागातर्फे सह्याद्री अतिथीगृहात आयोजित ‘सीएसआर मिट २०१९’ मध्ये ते बोलत होेते. या वेळी राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासह ७५ हून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. निलंगेकर म्हणाले, आयटीआयमधील प्रशिक्षण कुशल मनुष्यबळ घडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्यभरातील आयटीआयचे विविध कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आधुनिकीकरण करण्यात येत आहे.