इटस बॅटल ऑफ पॉलिटिक्स..

By admin | Published: October 13, 2014 10:57 PM2014-10-13T22:57:17+5:302014-10-13T22:57:17+5:30

विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुती व आघाडीत ‘बिघाडी’ झाली. अखेर युती, आघाडीची पॉलिटिकल फ्रेण्डशिप ‘ब्रेक’ झाली.

It's Battle of Politics .. | इटस बॅटल ऑफ पॉलिटिक्स..

इटस बॅटल ऑफ पॉलिटिक्स..

Next
ठाणो - विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि महायुती व आघाडीत ‘बिघाडी’  झाली. अखेर युती, आघाडीची 
पॉलिटिकल फ्रेण्डशिप ‘ब्रेक’ झाली. मात्र, ‘आज आघाडी, उद्या बिघाडी’, या सगळ्या प्रकाराला जनता चांगलीच वैतागली होती. त्यांनादेखील हे दोघे इतके ताणतील, असे वाटले नव्हते. मात्र, ताणल्यावर तुटतेच, हा नियमच आहे. त्याला राजकीय पक्ष तरी अपवाद कसे ठरावे?   या सगळ्याचे फलित काय, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणारच आहे. पण, सध्या महाराष्ट्रात जो तो स्वबळाची ताकद आजमावत आहे. कोणाला किती यश मिळते, कोणाच्या पदरात किती जागा पडतात आणि कोणाचे बळ किती आहे, याविषयी नवतरुण मतदारांमध्ये काय मते आहेत. त्यांना काय वाटते, सध्याच्या पॉलिटिक्सविषयी, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, इट्स बॅटल ऑफ पॉलिटिक्स..
 
कॉलेजच्या कट्टय़ावरची धम्माल, ‘ती’ कॉलेजमध्ये कधी येईल यासाठी तासनतास गेटकडे डोळे लावून बसणं, कॉलेजमधल्या ‘मामा’सोबतची आपली दोस्ती, मित्रंबरोबर बंक केलेली लेक्चर्स, त्यासाठी प्रोफेसरांना दिलेली खोटी कारणं, मित्रंनीही केलेली प्रॉक्सीची मदत.. असे मौज आणि मस्तीने भरलेले ते कॉलेजचे क्षण.. या आणि अशा तुमच्या धम्माल गोष्टी शेअर करण्यासाठी ‘लोकमत’ने स्पेशली तुमच्यासाठी आणलाय हक्काचा प्लॅटफॉर्म.. पाठवा तुमच्या हटके आठवणी ’‘ें3ूेंस्र42ॅें्र’.ूे या
 ई-मेल आयडीवर.
 
लोकशाही हक्क बजावतो
मेकॅनिकल इंजिनीअरिंग केलेला मंदार मेहत्रे म्हणतो की, मला लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क मी बजावतो. आतार्पयत मी पाच वेळा मतदान केले आहे. दोन निवडणुकांमध्ये मतदानाची स्लीप न मिळाल्यामुळे त्याचे मतदान हुकले होते. त्यासाठी सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. मतदान करताना उमेदवार काय काम करणार आहे, याचा विचार करूनच मत देतो. उमेदवार किती चांगला आणि शिक्षित आहे, त्याचाही विचार करतो. महायुती होणो अपेक्षित होते. मात्र, नेत्यांचा राजकीय स्वार्थ व हेकेखोरपणामुळे युती अहंकाराचा बळी ठरली. जनतेला स्वत:चे भले हवे असेल तर सगळ्यांनी योग्य उमेदवाराला मतदान केल्यास लोकशाही स्ट्राँग होण्यास मदत होऊ शकते.
 
जनतेला वेठीस धरणो अयोग्य
कांचन रमणो सांगते की, आघाडी व महायुतीच्या चर्चेत मला फार रस नव्हता. जी जनता एका पक्षाला मानते, त्याच पक्षाकडून त्या जनतेचा भ्रमनिरास केला जातो. जनतेला वेठीस धरून तिचा विश्वासघात करणो, हे कितपत योग्य आहे. इट्स रॉँग. मी मतदानाचा हक्क बजावते.  नागरिकशास्त्रचा धडा शिकून तो पुढे अमलात न आणणो, हा शिक्षणाचा आणि देशाचा अपमान असल्याचे मला वाटते. योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. एक मत देशाचे चित्र पालटू शकते. एकेक करून अशी असंख्य मते देशाच्या विकासासाठी लायक लोकप्रतिनिधी निवडून देऊ शकतात. राजकारणात मला फारसा रस नसला तरी राजकारण्यांच्या हाती सत्ता असल्याने पेपर व टीव्हीच्या बातम्या पाहून राजकारणात काय चालले आहे, याची जुजबी माहिती मी नेहमी घेत असते. सध्याच्या राजकारणाचे हे डर्टी स्वरूप चांगल्या उमेदवाराला निवडून दिल्याने बदलू शकते.
 
मतविभाजनाचा फटका बसणार
शास्त्रीय गायिका असलेल्या नूपुर काशीद हिने सांगितले की, सध्याच्या फुटाफुटीच्या राजकारणामुळे निवडून येणा:या पक्षाचा मतदारांवर किती प्रभाव आहे, हे आता कळेल. प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार असल्याने प्रत्येकालाच मतांच्या विभाजनाचा फटका बसणार आहे. त्यामुळेच संभाव्य निकाल काय असेल, याचा अंदाज बांधणो या वेळी खूपच कठीण आहे. जनहितासाठी नव्हे तर केवळ सत्तेसाठीच सर्वाची लढाई सुरू आहे. आज सत्ता मिळविण्यासाठी बहुतेक जण आपला पक्ष सोडून जातात. काही जण विविध प्रकारची आमिषे दाखवून नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व पाहून मतदारांनी वेळीच जागे व्हावे, असे वाटते. खरोखर, समाजासाठी जो चांगले काम करतो, त्यालाच निवडून द्यायला हव़े 

 

Web Title: It's Battle of Politics ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.