पुन्हा घुमणार ‘ले पंगा...’
By Admin | Published: December 11, 2015 01:38 AM2015-12-11T01:38:43+5:302015-12-11T01:38:43+5:30
प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात ३० जानेवारी २०१६ पासून होईल. या सत्रात सर्वप्रथम गतविजेता ‘यू मुंबा’ आणि उपविजेते ‘तेलुगू टायटन्स’ हे संघ आमनेसामने येतील.
मुंबई : प्रो-कबड्डीच्या तिसऱ्या सत्राची सुरुवात ३० जानेवारी २०१६ पासून होईल. या सत्रात सर्वप्रथम गतविजेता ‘यू मुंबा’ आणि उपविजेते ‘तेलुगू टायटन्स’ हे संघ आमनेसामने येतील. तिसऱ्या सत्राच्या पहिल्या भागाचे यजमानपद हैदराबादकडे दिल्याने स्पर्धेतील उद्घाटनाचा सामना गाचीबोली इनडोअर स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल.
आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ, आशियाई कबड्डी महासंघ आणि अमॅच्युअर कबड्डी महासंघ यांच्या सहयोगाने मार्शल स्पोटर््स आयोजित प्रो-कबड्डीचे सामने पार पडणार आहेत. आठ शहरांमध्ये इनडोअर स्टेडियममध्ये एकूण ६० सामने खेळवण्यात येतील. याही सत्रात कॅरव्हान स्टाइलचा अवलंब करण्यात येणार आहे. प्रत्येक फ्रँचाईजी शहरामध्ये चार दिवस लीग सामने खेळतील. स्थानिक संघ, भेट देणाऱ्या चार फ्रँचाईजी संघाबरोबर खेळेल. सर्व सात पाहुणे संघ प्रत्येक शहरामध्ये एक सेट पूर्ण करतील. उपांत्य, बाद फेरी आणि अंतिम सामन्यासाठी संघ पुन्हा दिल्लीला जातील. (क्रीडा प्रतिनिधी)