गाडीचा ब्रेक लागलाच नाही...

By admin | Published: June 29, 2015 03:11 AM2015-06-29T03:11:34+5:302015-06-29T03:11:34+5:30

ब्रेक न लागल्यानेच चर्चगेट लोकलचा अपघात झाल्याचा जबाब मोटरमनकडून रेल्वेला देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

It's not a car break ... | गाडीचा ब्रेक लागलाच नाही...

गाडीचा ब्रेक लागलाच नाही...

Next

मुंबई : ब्रेक न लागल्यानेच चर्चगेट लोकलचा अपघात झाल्याचा जबाब मोटरमनकडून रेल्वेला देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र हा अपघात मोटरमनच्या चुकीमुळेही होऊ शकतो, असे सांगत चौकशीनंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील, असे रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी सांगितले. अपघात झाल्यानंतर मोटरमनचा मोबाइल तपासला असता यातील सर्व कॉल डिटेल्स (माहिती) नष्ट केले आहेत. त्यामुळे मोटरमन फोनवर बोलत होता का, याचाही तपास केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
सकाळी भार्इंदर स्थानकाहून सुटलेली लोकल मरिन लाइन स्थानकात येईपर्यंत मोटरमनकडून व्यवस्थितरीत्या लोकल चालवण्यात आली. मात्र चर्चगेट स्थानकात पोहोचताच बफरवर आदळून लोकलचा अपघात झाला. प्रत्येक लोकल चर्चगेट स्थानकात आल्यानंतर त्यांचा वेग हा ताशी ३0 किमी एवढा ठेवणे गरजचे आहे. ही लोकल चर्चगेट स्थानकात शिरताना तिचा वेग प्रतितास ३६ किमी एवढा होता. त्यामुळे या लोकलच्या ब्रेकमध्ये बिघाड झाला की काही अन्य कारण आहे याचा तपास रेल्वेकडून घेण्यात येत आहे. लोकलमधील मोटरमनच्या केबिनमध्ये इलेक्ट्रो न्युमेट्रीक ब्रेक प्रणाली, एअर ब्रेक प्रणाली आणि या दोघांना मिळून असलेली इर्मजन्सी ब्रेक प्रणाली असते. यात लोकलने चर्चगेट स्थानकात प्रवेश करताच इलेक्ट्रो न्युमेट्रीक ब्रेक प्रणाली मोटरमनकडून वापरण्यात आली. मात्र हा ब्रेक लागला नाही. ब्रेक न लागल्याने मोटरमनकडून थेट इर्मजन्सी ब्रेक वापरण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोही न लागल्याने आणि वेळ टळून गेल्याने अपघात झाल्याचे मोटरमनकडून रेल्वेला सांगण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. येत्या पाच दिवसांत चौकशी पूर्ण केली जाणार असल्याचे सूद म्हणाले.
मोटरमनला टीसी रोमन मॅकवेनने बाहेर काढले
चर्चगेट स्थानकात २ आणि ३ नंबर प्लॅटफॉर्मवर रोमन मॅकवॅन हा टीसी कार्यरत होता.
चर्चगेट स्थानकात लोकलचा अपघात झाला त्या वेळी हा अपघात रोमन मॅकवेनने जवळून पाहिला. ही लोकल स्थानकात वेगाने आली आणि बफरवर आदळल्याचे त्याने सांगितले. अपघात झाल्यानंतर मोटरमनला मी रेल्वे पोलिसांच्या साहाय्याने बाहेर काढले.

रेल्वे मंत्री फिरकलेच नाहीत
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे मुंख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमास सुरुवात झाली. तर अपघात सकाळी ११.२0 वाजता
झाला. मात्र अपघात होऊनही मुंबईत असणारे रेल्वे मंत्री अपघाताच्या ठिकाणी पोहोचले नाहीत. त्यामुळे मुंबईरांकडून त्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता.

> एल.एस. तिवारी गेली
२५ वर्षे मोटरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पहिली १५ वर्षे लोको पायलट म्हणून काम केले. त्यानंतर मोटरमन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे काम व्यवस्थित असल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.

Web Title: It's not a car break ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.