मुंबई : अभिनयाचे विविध पैलू सादर करत चाहत्यांना आकर्षित करणाऱ्या अभिनेता सलमान खानने त्याच्या याच शैलीत शुक्रवारी स्वत:वरील सर्व आरोप फेटाळले. वांद्रे येथे अपघात करून एकाचा बळी घेणाऱ्या सलमानने ‘तो मी नव्हेच’, असा पवित्रा घेत हात झटकले. विशेष म्हणजे पोलिसांनी नाहक आपल्याला यात गोवल्याची पुष्टीही त्याने जोडली.वांद्रे येथे २००२ मध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी सलमानचा सीआरपीसी कलम ३१३ अंतर्गत जबाब नोंदवला. यात न्यायालयाने या घटनेशीसंबंधीत तब्बल ४१८ प्रश्न सलमानला विचारले. या सर्वांची सलमानने अगदी सावधपणे उत्तरे दिले. कोठेही गल्लत होणार नाही, याची काळजी सलमान घेत होता. तरीही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा असलेला सल्लूभाई थोडासा अस्वस्थच दिसत होता. सलमान निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी सलमानचे वकील येत्या सोमवारी दोन साक्षीदार तपासणार आहे. पांढरा रंगाचा शर्ट व निळ्या रंगाच्या जीन्समध्ये सलमान जबाब देण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास न्यायालयात दाखल झाला. साडेअकराच्या सुमारास त्याचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले. पावणे दोनपर्यंत हे कामकाज सुरू होते. जेवण्याच्या सुट्टीनंतर पावणे तीन वाजता हे काम पुन्हा सुरू झाले व साडेचार वाजता सलमानचा जबाब नोंदवून पूर्ण झाला. सलमानला बघण्याचा मोह कर्मचाऱ्यांना आवरता आला नाही. त्यामुळे कोर्टात एकच गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)मी दारू प्यायलो नव्हतोबारमध्ये माझ्या ग्लासात पाणी होतेमी गाडी चालवत नव्हतोमाझा ड्राईव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता. मी त्याच्या शेजारच्या सीटवर बसलो होतोगाडीचा माझ्या बाजूचा दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे मी ड्राईव्हरच्या बाजूच्या दिशेने गाडी बाहेर पडलोमी घटनास्थळावरून पळून गेलो नाहीतेथे जमाव जमा झाल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे माझे स्रेही फ्रान्सिस यांनी मला तेथून जाण्यास सांगितले. तरीही पंधरा मिनिटे मी तेथेच होतोउलट मीच ड्रायव्हरला जखमींना रूग्णालयात नेण्यास व या अपघाताबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितलेपोलिसांनी मला अटक केली नाही. मी स्वत: शरण आलो.दिवंगत हवालदार रवींद्र पाटील या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. कारण तो गाडीत झोपला होता. माझ्या रक्ताचे नमुने घेणारे व तपासणारे तज्ज्ञ नव्हते.
तो मी नव्हेच... ‘चुलबुल पांडे’ने हात झटकले
By admin | Published: March 28, 2015 1:27 AM