'ठीक आहे'! जे.डे हत्या प्रकरणात शिक्षा सुनाविल्यानंतर छोटा राजनची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 09:08 AM2018-05-03T09:08:44+5:302018-05-03T09:08:44+5:30

शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीशांनी छोटा राजनला शिक्षेवर काही बोलायचं आहे का? असं विचारलं.

It’s okay, says gangster Chhota Rajan after J Dey case verdict | 'ठीक आहे'! जे.डे हत्या प्रकरणात शिक्षा सुनाविल्यानंतर छोटा राजनची प्रतिक्रिया

'ठीक आहे'! जे.डे हत्या प्रकरणात शिक्षा सुनाविल्यानंतर छोटा राजनची प्रतिक्रिया

Next

मुंबई- ज्येष्ठ पत्रकार जे.डे हत्याकांड प्रकरणात बुधवारी मुंबईच्या विशेष मकोका कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह 9 लोकांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दिपक सिसोदिया व्यतिरिक्त प्रत्येक आरोपीवर 26-26 लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. जे.डे हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीसाठी छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरुंगातून  ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आलं.
शिक्षा सुनावल्यावर न्यायाधीशांनी छोटा राजनला शिक्षेवर काही बोलायचं आहे का? असं विचारलं. न्यायाधीशांच्या प्रश्नावर 'ठीक आहे' इतकंच उत्तर छोटा राजनने दिलं. 

मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर सडेतोड लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे उर्फ जे. डे यांचा सुमारे सात वर्षांपूर्वी सुपारी देऊन खून केल्याबद्दल येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने बुधवारी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन आणि त्याचा नेमबाज शूटर सतीश कालिया यांच्यासह एकूण नऊ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अनेक खटल्यांसाठी पोर्तुगालहून भारतात आणलेल्या छोटा राजनला झालेली ही पहिलीच जन्मठेप आहे. दिल्लीच्या तिहार कारागृहात असलेल्या राजनला ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे हजर करण्यात आलं. शिक्षा ठोठावल्यानंतर, त्याने ‘ठीक आहे’ प्रतिक्रिया व्यक्त केली.
 

Web Title: It’s okay, says gangster Chhota Rajan after J Dey case verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.